शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पातुरात युवकांच्या लसीकरणाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST

पातूर : कोविन आणि आरोग्य सेतू ॲपद्वारे नोंदणी करणाऱ्या पहिल्या पाचशे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण बुधवारपासून ...

पातूर : कोविन आणि आरोग्य सेतू ॲपद्वारे नोंदणी करणाऱ्या पहिल्या पाचशे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण बुधवारपासून डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालय (कोविड केअर सेंटर) येथे सुरू झाले आहे. युवकांनी या लसीकरणाचा घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. चिराग रेवाळे यांनी केले आहे.

पातूर तालुक्यात नोंदणी करणाऱ्या पहिल्या ५०० युवकांना कोविड लस दिली जाणार आहे. त्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनी आरोग्य सेतू आणि कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच लस दिली जाणार आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पातूर तालुक्यातील ४५पेक्षा अधिक वयाचे तथा दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांसाठी दिली जाणारी लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे पातूर तालुक्यातील १६ लसीकरण केंद्र बंद झाली होती. मात्र, बुधवारपासून पातूर, बाभुळगाव, मळसूर, आलेगाव, सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम येणाऱ्या पहिल्या १३० जणांना कोविड लस दिली जाणार आहे.

लसीअभावी ११ लसीकरण केंद्र बंदच

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लसींचा साठा उपलब्ध होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पातूर तालुक्यात २१६ रुग्ण सक्रिय आहेत, त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र, हे सक्रिय रुग्ण सर्वत्र फिरत असल्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील ११ लसीकरण केंद्र अद्यापही बंद असल्याची माहिती आहे.

परप्रांतातील २०० कुटुंब परतली

गुजरात राज्यात रसवंतीचा व्यवसाय करायला गेलेली शिर्ला येथील दोनशे कुटुंब गावाकडे परतली आहेत. त्यातील अनेकांना कोरोनासदृश्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शिर्ला येथे आरटीपीसीआर व ॲन्टिजेन रॅपिड चाचणी मोहीम राबविण्याची गरज आहे. यातील एकाचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.