शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी ऊर्जा पर्वाची सुरुवात; ५० शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 11:00 IST

MSEDCL News ५० शेतकऱ्यांचा प्रातिनीधिक स्वरूपात सन्मानपत्र, कृषी ऊर्जा पर्वाची लोगो असलेली टि शर्ट आणि टोपी देऊन सत्कार करण्यात आला.

अकोला : वीज जोडणी बाबतचे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने व त्वरित सोडविण्यासाठी तसेच कृषी पंपाच्या थकबाकीतून मोठा दिलासा देत शेतकऱ्यांना थेट ६६ टक्क्यांची सवलत देण्याच्या उद्देशाने महावितरणने आयोजित केलेल्या कृषी ऊर्जा पर्वाची सुरुवात अकोला परिमंडळात झाली आहे. यानिमित्ताने जिल्हयातील थकबाकीमुक्त झालेल्या ५० शेतकऱ्यांचा प्रातिनीधिक स्वरूपात सन्मानपत्र, कृषी ऊर्जा पर्वाची लोगो असलेली टि शर्ट आणि टोपी देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते ''कृषी ऊर्जा पर्वाच्या'' बॅनरचे उद्‌घाटन करण्यात आले.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची थकबाकीतून ६६ टक्क्यांची माफी देत थकबाकी कोरी करून देणे. सहाशे मीटरच्या आत असलेल्या कृषी पंपांना लघूदाब व उच्चदाब वाहिनीव्दारे वीज जोडणी देणे , ६०० मीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाव्दारे वीज जोडणी देण्याच्या उद्देशाने महाकृषी ऊर्जा अभियान राज्यात सर्वत्र राबविले जात आहे.

व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेश गीते, नागपुर विभागाचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी यांच्या निर्देशानुसार १ मार्च ते १४ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून ''कृषी ऊर्जा पर्व'' संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या पर्वात शेतकऱ्यांना त्वरीत नविन वीज जोडणी,सौर कृषी वाहिनीव्दारे दिवसा वीज पुरवठा,कृषी ग्राहकांना थकबाकीत ६६ टक्क्यापर्यंत असलेली सुट,कृषी ग्राहकांकरिता पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण,ग्रामपंचायतींचा सहभाग व सक्षमीकरण आदीबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. विद्युत भवन येथे १० थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोलाFarmerशेतकरी