कोठारी: पातूर तालुक्यातील कोठारी बु. येथे ११ मे रोजी सकाळी मधमाशांनी दोघांवर हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. समशेर खा पठाण यांच्या शेतात कांद्याची कापणी सुरू असताना बाजूलाच असलेल्या आंब्याच्या झाडावरील मधमाशांनी दोघांवर हल्ला केला. यामध्ये संजय रामजी मागाडे व समशेर खा पठाण हे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मधमाशांचा हल्ला; दोघे जखमी
By admin | Updated: May 12, 2017 08:35 IST