शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जि. प., पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहा!- राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:19 IST

अकोला: बरखास्त करण्यात आलेल्या पाच जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी मंगळवारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे दिले.

अकोला: बरखास्त करण्यात आलेल्या पाच जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी मंगळवारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे दिले.नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत पंचायत समित्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर देण्यात आलेली मुदतवाढ याआधीच संपुष्टात आली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या जिल्हा परिषदांना मुदतवाढ देण्यास नकार दिला होता. त्यानुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत पंचायत समित्या राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत १८ जुलै रोजी बरखास्त करण्यात आल्या असून, जिल्हा परिषदांचा कारभार हाकण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना (सीईओ) प्रशासक म्हणून तसेच संबंधित गटविकास अधिकाºयांना पंचायत समितींचे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.बरखास्त करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी २३ जुलै रोजी नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाचही जिल्हाधिकाºयांसह संबंधित अधिकाºयांची ‘व्हिडिओ कॉन्फन्स’ घेतली. पाचही जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी संबंधित पाचही जिल्हाधिकाºयांना दिले. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसदर्भात इतर विषयांवरही राज्य निवडणूक आयुक्तांनी अधिकाºयांकडून माहिती घेतली. राज्य निवडणूक आयुक्तांच्या या ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’मध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले सहभागी झाले होते.पूर्वतयारीचा अहवाल तातडीने सादर करा!जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी पाचही जिल्हाधिकाºयांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे दिले.

टॅग्स :AkolaअकोलाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAkola ZPअकोला जिल्हा परिषद