शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

‘बीडीओ’ विरुद्ध एल्गार; सदस्यांचा सभात्याग

By admin | Updated: March 15, 2016 02:27 IST

अकोला पंचायत समितीची सभा: ‘बीडीओ’वर मनमानीचा आरोप.

अकोला: परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी (बीडीओ) सदस्यांचे म्हणणे ऐकून न घेता, मनमानी करीत असल्याचा आरोप करीत, ह्यबीडीओह्णविरुद्ध एल्गार पुकारलेल्या पदाधिकारी व सदस्यांनी सोमवारी अकोला पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला. त्यामुळे या सभेत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. अकोला पंचायत समितीची सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर, सदस्य सतीश मानकर यांनी मुख्यालयी न राहणार्‍या उमरी व डाबकी येथील शिक्षकांच्या चौकशीबाबत विचारणा केली. त्यावर परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा प्रभारी गटविकास आचल सूद गोयल यांनी, यासंदर्भात ह्यमी बघून घेईल, तो माझा अधिकार आहे, असे उत्तर दिले. तसेच सदस्य गणेश अंधारे यांनी शालेय विद्यार्थ्यांंच्या क्रीडा स्पर्धेची योजना का राबविण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता, याबाबत आवश्यक ती कारवाई केली जाईल. त्यामुळे ते मला सांगण्याची गरज नाही, असे ह्यबीडीओंह्णनी सांगितले. या पृष्ठभूमीवर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सकारात्मक उत्तर देण्याची मागणी सदस्य विलास जगताप यांनी ह्यबीडीओंह्णकडे केली असता, माझ्याशी असे बोलू नका, असे सांगत, ह्यबीडीओंह्णनी सदस्य जगताप यांना जागेवर बसण्याचा सल्ला दिला. सभेत कोणत्याही विषयाची माहिती न देता, ह्यदेख लेंगे, सोचेंगे, करेंगेह्ण अशी उत्तरे ह्यबीडीओंह्णकडून सदस्यांना देण्यात आली. सदस्यांचे म्हणणे ह्यबीडीओह्ण ऐकून घेत नसल्याने, त्यांच्यावर मनमानी करीत असल्याचा आरोप करीत, सभापती गंगू धामोळे, उपसभापती शारदा गावंडे यांच्या सदस्यांनी पंचायत समितीच्या सभेतून सभात्याग केला. पदाधिकार्‍यांसह सर्व सदस्यांनी सभात्याग केल्याने, पंचायत समितीच्या या सभेत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. ह्यबीडीओह्णविरुद्ध देणार धरणे; सदस्यांच्या बैठकीत निर्णय! सभात्याग केल्यानंतर पदाधिकारी व सदस्यांची पंचायत समिती सभापती गंगू धामोळे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत बीडीओ आचल सूद गोयल मनमानी करीत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध पंचायत समिती सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, असे सदस्यांनी सांगितले.