शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांचा बॅच, नोंदणी क्रमांक महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:07 IST

जिल्ह्यासह विदर्भात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होवून ३५ शेतकर्‍यांचा मृत्यू झाला तर ५00 चे वर शेतकर्‍यांना विषबाधा झाल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यामूळे किटकनाशकांची खरेदी , साठवणूक, हाताळणी व फवारणी करतांना काळजी घेणे महत्वाचे आहे.

ठळक मुद्देजनजागृतीची गरज खरेदी, साठवणूक, फवारणी करताना दक्षता हवी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यासह विदर्भात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होवून ३५ शेतकर्‍यांचा मृत्यू झाला तर ५00 चे वर शेतकर्‍यांना विषबाधा झाल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यामूळे किटकनाशकांची खरेदी , साठवणूक, हाताळणी व फवारणी करतांना काळजी घेणे महत्वाचे आहे.अनोळखी किंवा विनापरवाना किटकनाशकांची खरेदी करू नये, परवानाधारक विक्रेत्याकडूनच कीटकनाशक खरेदी करावे. हंगामपूर्व कीटकनाशक खरेदी करून ठेवू नये. खरेदीपूर्व बॅच नंबर, केंद्रीय कीटकनाशक नोंदणी  मंडळाचा क्रमांक, उत्पादन तारिख बघूनच खरेदी करावी. अंतिम तारिख संपलेली किंवा संपत असलेली  कीटकनाशके खरेदी करू नयेत. पॅकिंगचे देखील काही नियम आहेत. व्यवस्थित पॅकिंग केलेली कीटकनाशके खरेदी करावीत, गळती होणार्‍या पॅकिंगची औषधी खरेदी करू नयेत.राहत्या घरात कीटकनाशके ठेवू नयेत. दूर सुरक्षितस्थळी साठवणूक करावी. मुळचे पॅकिंग, वेष्टन ठेवावीत .    इतर पॅकिंगध्ये कीटकनाशक ओतू नयेत. घरी असलेल्या कीटकनाशके व तणनाशके यांची शेतकर्‍यांनी वेगवेगळी साठवणूक करावी व तेथे धोक्याची सुचना लिहून ठेवावी, लहान मुले पोहचू शकणार नाहीत, अशा ठिकाणी ठेवावेत. सूर्यप्रकाश, पावसाचे पाणी किंवा हवेच्या झुळूकीसी संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी. वाहतूक करताना कीटकनाशके स्वतंत्र पिशवीत ठेवावीत. मोठय़ा प्रमाणार कीटकनाशक डोक्यावर, खांद्यावर अथवा पाठीवर घेवू नये, आदी सुचना कृषी विभागाने केल्या आहेत.

फवारणी करताना ही घ्यावी काळजीपीकावर कीटकनाशकांची फवारणी शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसताना करावी. उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिनण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते. फवारणी करताना वारे वाहणार्‍या दिशेला तोंड करुन फवारणी करावी. वारे वाहण्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करुन किटकनाशकांची फवारणी केल्यास फवारा शरीरावर पडून शरीरात विष भिनण्याची शक्यता असते. फवारणी करताना जवळपास अन्य संबंधित व्यक्ती अथवा जनावरांची उपस्थिती असू नये.ऑगेर्नोफॉस्फरस अथवा काबार्मेट अथवा क्लोरिन गटातील किटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस + सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन, इत्यादी.) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीच्यावेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.संरक्षण साहित्य वापरल्याशिवाय द्रावण तयार करु नये.हातमोजे,मास्क,अँप्रान ,पुर्ण पॅन्ट ,गॉगल वापरण्याच्या सुचना कृषी विभागाने शेतकर्‍यांना केल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेती