शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विविध पद्धतीच्या आधारे विक्रमी उत्पादन घेणारा ‘समर्थ’

By admin | Updated: November 8, 2016 10:25 IST

अवघ्या दोन एकर क्षेत्रात पाण्याचा काटकसरीने वापर करून आधुनिक पद्धत अवलंबवत षेतक-याने ३ महिन्यांत विक्रमी उत्पादन घेतले आहे.

शेतकऱ्याचे यश: दोन एकर शेतात ४३२ क्विंटल मिरची

दादाराव गायकवाड, ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. ८ -  अवघ्या दोन एकर क्षेत्रात पाण्याचा काटकसरीने वापर करून आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत तीन महिन्यांत ४३२ क्विंटल मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची कामगिरी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्याने केली आहे. समर्थ केशव भगत असे या शेतकऱ्याचे नाव असून, तालुक्यातील मोहगव्हाण-चांभई शिवारात त्यांचे शेत आहे.समर्थ भगत यांच्याकडे सहा एकर शेती आहे. या शेतीत ते नेहमी विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन घेतात. पिकांचे वाण, पिकाचा प्रकार याची पारख करण्यासह विषम वातावरणातही नुकसान टाळण्याचे कसब त्यांना चांगले अवगत आहे. त्यामुळेच तालुक्यातील नव्हे, तर जिल्ह्यातील काही निवडक यशस्वी शेतकऱ्यांत त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. समर्थ भगत हे प्रामुख्याने खरीपातील तूर, सोयाबीन, तसच रब्बी हंगमातील गहू, हरभरा या पिकांसह फुलकोबी, ढोबळी मिरची, सिमला मिरची, साधी मिरची, कांदा, कोथींबीर, मेथी, वांगी आदि भाजीपाला पिकांचे उत्पादन आलटून पालटून घेत असतात. यंदा त्यांनी आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आपल्या एकूण शेतापैकी ३५ गुंठे क्षेत्रात साधी मिरची लावली, तर सव्वा एकर क्षेत्रात ढोबळी आणि सिमला मिरचीची लागवड केली. यात आजवर साध्या मिरचीतून त्यांना एकशे साठ क्ंिवटल, तर ढोबळी आणि सिमला मिरचीतून २७२ क्विंटलचे उत्पादन झाले. साध्या मिरचीला सरासरी १५ रुपये प्रति किलोचा भाव मिळाल्याने त्यांना एकशे साठ क्विंटलमधून दोन लाख ४० हजार, तर ढोबळी आणि सिमला मिरचीला सरासरी १८ रुपये प्रति किलो भाव मिळाल्याने २७२ क्विंटलमधून ४ लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न झाले, असे दोन्ही प्रकारच्या मिरचीतून अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधित त्यांना ७ लाख २९ हजार रुपयांचे विक्रमी उत्पादन झाले. मिरचीची लागवड करण्यासाठी मल्चिंग पद्धतीचा अवलंब केला. खतांचे, पाण्याचे प्रभावी नियोजन आणि योग्य काळजीमुळेच त्यांना एवढे विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले. या मिरची पिकातून त्यांना आणखी पावणे दोन क्विंटलचे उत्पादन होण्याचा विश्वास आहे.