शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बार्शिटाकळी : मुलगा, मुलगी व नातवाच्या छळाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:01 IST

बार्शिटाकळी : स्थानिक अशोकनगरामधील ८0 वर्षीय वृद्ध इसमाचे मुलगा, मुलगी व नातू यांनी संगनमत करून घर विकले. त्या वृद्धास काटेपूर्णा येथे घरी नेऊन त्यांचा अनन्वित छळ करून घरातून हाकलून दिले. या सार्‍या छळास कंटाळून सदर वृद्धाने २७ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देवृद्धाने लिहिलेल्या चिठ्ठय़ांच्या आधारे तिघांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शिटाकळी : स्थानिक अशोकनगरामधील ८0 वर्षीय वृद्ध इसमाचे मुलगा, मुलगी व नातू यांनी संगनमत करून घर विकले. त्या वृद्धास काटेपूर्णा येथे घरी नेऊन त्यांचा अनन्वित छळ करून घरातून हाकलून दिले. या सार्‍या छळास कंटाळून सदर वृद्धाने २७ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या वृद्धाने मृत्यूपूर्वी पोलीस अधिकार्‍यांच्या नावे लिहून ठेवलेल्या पाच चिठ्ठय़ांच्या आधारे बाश्रीटाकळी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बार्शिटाकळी येथील अशोक नगरातील चोखाराम जयराम जामनिक (८0) यांचे स्वत:च्या मालकीचे घर मुलगा रामदास, मुलगी शोभा दिलीप मोहोड व तिचा मुलगा यांनी संगनमत करून विकले. त्यानंतर चोखाराम यांना काटेपूर्णा या गावी नेऊन आरोपींनी त्यांचा अनन्वित छळ केला. अखेर त्यांना घरातून हाकलून दिले. हा सर्व छळ असह्य झाल्याने चोखाराम यांनी पोलीस अधिकार्‍यांच्या नावाने पाच चिठ्ठय़ा लिहून बुधवारी सकाळी ११ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.  या घटनेच्या इनक्वेस्ट पंचनाम्यात या पाच चिठ्ठय़ा आढळून आल्या. या आत्महत्येच्या घटनेबाबत पोलीस पाटील श्रीराम येळवणकर यांच्या फिर्यादीवरून बार्शिटाकळी पोलिसांनी त्या चिठ्ठय़ांच्या आधारे रामदास जामनिक, शोभा दिलीप मोहोड व तिचा मुलगा यांच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या ३0६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक खांडवाये पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणSuicideआत्महत्या