शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपा-कंत्राटदाराच्या घोळात बॅरिकेडिंगला विलंब

By admin | Updated: September 16, 2016 03:11 IST

मनपा कारवाईच्या तयारीत; अहवाल पाठवणार शासनाकडे.

अकोला, दि. १५- सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पृष्ठभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशातून महापालिकेच्यावतीने शहरात बॅरिके डिंगची व्यवस्था केली जाते. यंदा मात्र मनपा व कंत्राटदाराच्या आपसातील घोळामुळे बॅरिकेडिंगला विलंब झाला. संबंधित कंत्राटदाराने हा घोळ जाणीवपूर्वक निर्माण केल्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनासह मनपाने घेतली असून कंत्राटदाराचा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गणेश उत्सवाच्या काळात शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशातून गणेश विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड लावल्या जातात. ही व्यवस्था पोलिसांच्या सूचनेनुसार मनपाकडून पूर्ण केली जाते. मनपाचे तत्कालीन आयुक्त दौलतखान पठाण यांच्या कालावधीत या व्यवस्थेची जबाबदारी मनपाकडे घेण्यात आली होती. तेव्हापासून गणेश विसर्जन मार्गावर ठरावीक ठिकाणी बॅरिकेड लावण्याचा कंत्राट श्री नाना उजवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर यांना दिला जातो. यंदा प्रथमच बॅरिकेड लावण्याच्या कामाची निविदा प्रकाशित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला. ९ सप्टेंबर रोजी एका स्थानिक वृत्तपत्रात निविदा प्रकाशित केली. निविदा अर्ज कोणी सादर न केल्यामुळे तसेच सदर कामाचे देयक नगदी स्वरूपाचे असल्याने बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री उजवणे यांची भेट घेतली. दुसर्‍या दिवशी विलास जोशी नावाच्या कंत्राटदाराने काम करण्याची तयारी दर्शवल्याने मनपाने जोशी यांना बॅरिकेड लावण्याचा कंत्राट दिला. जोशी यांनी १४ सप्टेंबरच्या सायंकाळी अर्थातच गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला बॅरिकेडिंगची कामे पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु जोशी यांच्याकडील मजुरांना चढय़ा दराने मजुरी देऊन दुसरीकडे नेण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे १४ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंतही कामाला सुरुवात न झाल्याचे पाहून जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व मनपाची धावपळ सुरू झाली.