शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा.. पुढच्या वर्षी लवकर या!

By admin | Updated: September 16, 2016 03:15 IST

गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणा-या गणरायांनी गुरुवारी निरोप घेतला

अकोला, दि. १५ - ओसांडून वाहणारा गणेश मंडळांचा उत्साह, ढोलताशे व झांज यांचा गजर, गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष व गेल्या पाच आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे आगमन अशा मनोहरी वातावरणात पुढच्या वर्षी लवकर या.. अशा गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणार्‍या गणरायांनी गुरुवारी निरोप घेतला. जिल्हाभरात १,७९१ व शहरातील ६८४ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकींना सकाळीच प्रारंभ झाला. अकोल्यात मानाच्या बाराभाई गणपतीची विधिवत पूजा करून सुरू झालेली मिरवणूक गणेश भक्तांच्या उत्साहाने ओसांडून वाहत होती. अकोल्यातील मानाच्या समजल्या जाणार्‍या बाराभाईच्या गणेश मूर्तीचे पूजन गुरुवारी सकाळी ११.00 वाजता जयहिंद चौकात झाले. महाआरती आणि पूजनानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर जयहिंद चौकातून अगरवेसकडे ११.१५ वाजता मिरवणूक निघाली. रात्री १२ वाजेनंतर झाला मिरवणुकीचा समारोप !रात्री बारा वाजता ताजनापेठ पोलीस चौकींसमोर मिरवणुकीच्या समारोप कार्यक्रमाला सुरूवात झाली व अध्र्या तासामध्ये कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी जी.ङ्म्रीकांत व पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचा सत्कार करण्यात आला. मीणा यांनी नागरिक, शांतीदूत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांचे आभार मानले. रात्री १२ वाजेपर्यंत २८ गणेश मंडळांनी ताजनापेठ चौकातून गणेश घाटाकडे प्रस्थान केले होते. मिरवणुकीतील उर्वरित मंडळ यानंतर गांधीग्रामकडे गणेश विसर्जनासाठी रवाना झाले. तडीपार केलेल्या आरोपीस अटकगणेशोत्सवादरम्यान तडीपार करण्यात आलेला आरोपी शेख रज्जाक शेख सुलतान (१९ रा. पंचशीलनगर, खरप रोड) हा पोलिसांना गस्तीदरम्यान घरी मिळाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. शेख रज्जाक याला उपविभागीय अधिकार्‍यांनी त्याला १२ ते १६ सप्टेंबरदरम्यान शहरातून तडीपार केले होते.