शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील बपोरी पाणी पुरवठा योजनेत अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:55 IST

पिंप्री जैनपूर येथे अशाच प्रकरणात फौजदारी दाखल केल्यानंतर आता बपोरी योजना राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे निर्देश जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले.

ठळक मुद्देयोजनेसाठी फेब्रुवारी २०१३ मध्ये ३३ लाख ९९ हजार १५९ रुपये निधीला मंजुरी देण्यात आली. समितीमार्फत विहीर, उंच टाकीच्या कामाला सुरुवात केली; मात्र कामे पूर्ण झाली नाही. मूल्यांकनानुसार अपहार झालेली रक्कम ३ लाख १८ हजार ७४३ रुपये शासनजमा करण्याचे बजावले.

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कोट्यवधींचा निधी घेऊन कामे पूर्ण न करणाऱ्या जिल्ह्यातील ६९ गावांतील ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे पदाधिकारी आता फौजदारी कारवाईत अडकणार आहेत. त्यापैकी पिंप्री जैनपूर येथे अशाच प्रकरणात फौजदारी दाखल केल्यानंतर आता बपोरी योजना राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे निर्देश जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून बपोरी पाणी पुरवठा योजनेसाठी फेब्रुवारी २०१३ मध्ये ३३ लाख ९९ हजार १५९ रुपये निधीला मंजुरी देण्यात आली. ग्राम पाणी पुरवठा समिती अध्यक्ष अतुल रामेश्वर मुगल, सचिव शीला शंकर तलवारे यांच्याकडून कामाला सुरुवात झाली. समितीकडे पहिला हप्ता ८ लाख ५३ हजार ५२९ रुपये आणि लोकवर्गणीची मिळून १० लाख २९ हजार १५८ रुपये उपलब्ध होते. त्यातून समितीमार्फत विहीर, उंच टाकीच्या कामाला सुरुवात केली; मात्र कामे पूर्ण झाली नाही. काम सुरू असताना अभियंत्यांकडून मूल्यमापन करून न घेताच १० लाख २७ हजार ३९१ रुपये समिती पदाधिकाºयांनी काढून घेतले. काम पूर्ण नसल्याने त्याबाबत पाणी पुरवठा विभागाने सातत्याने त्याबाबत समितीला कळविले, तरीही समितीने काम पूर्ण केले नाही. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने ३१ मार्च २०१८ रोजी समिती अध्यक्ष अतुल मुगल, सचिव शीला तलवारे यांना पत्र देत मूल्यांकनानुसार अपहार झालेली रक्कम ३ लाख १८ हजार ७४३ रुपये शासनजमा करण्याचे बजावले. त्या पत्रालाही समितीने दाद दिली नाही. त्यामुळे १८ जून २०१८ रोजी गटविकास अधिकारी मूर्तिजापूर यांना पत्र देत समितीच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, तसेच रक्कम वसुलीही करावी, असे निर्देश देण्यात आले; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. आता जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग कारवाईसाठी कोणता पवित्रा घेते, यावर समिती पदाधिकाºयांचे भवितव्य अवलंबून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदfraudधोकेबाजी