शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खातेदाराच्या बँक लॉकरमधील दोन लाखांना लागली वाळवी!

By admin | Updated: April 1, 2016 00:46 IST

खातेदारास दोन लाख रुपये बदलून देण्याचे ग्राहक तक्रार निवारण मंचाचे बँकेस आदेश.

अकोला: खातेदाराने बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या दोन लाख रुपयांच्या नोटांना वाळवी लागल्याने, त्यांच्या नोटांचे नुकसान झाले. खातेदाराने बँकेकडे तक्रार केल्यानंतरही बँकेने खातेदारास नोटा बदलवून दिल्या नाहीत. त्यामुळे खातेदारास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे खातेदारास सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा गोरक्षण रोड यांनी दोन लाख रुपयांचा नोटा बदलून द्याव्यात आणि न्यायिक खर्च मिळून पाच हजार रुपये द्यावे, असे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. गोरक्षण रोडवर राहणारे श्रीराम शंकर ढवळे, कमल ढवळे यांनी गोरक्षण रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत संयुक्त लॉकर खाते उघडले आहे. ढवळे दाम्पत्याने महत्त्वपूर्ण दस्तऐवज, दागदागिने आणि रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवली होती. २ मार्च रोजी कमल ढवळे या बँकेतील लॉकरमधील रक्कम काढण्यासाठी गेल्या असता, त्यांना लॉकरमधील रोख रकमेला वाळवी लागल्याचे दिसून आले. त्यांनी शाखाधिकार्‍यांना लॉकरजवळ बोलावून नोटा दाखविल्या. त्यावेळी नोटांवर लगेच हिट स्प्रे टाकला. त्यानंतर तक्रारकर्तीने खराब झालेल्या नोटा बदलून देण्यास म्हटले असता, शाखाधिकार्‍याने पत्र देऊन नोटा बदलविण्यासाठी विभागीय कार्यालयासोबत संपर्क करू, असे स्पष्ट केले. त्यानंतर तक्रारकर्तीने अनेकादा नोटासंबंधी बँकेत जाऊन चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे तक्रारकर्तीने बँकेविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये धाव घेतली. ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये तक्रारकर्ती व बँकेची बाजू ऐकून घेण्यात आली. बँकेने त्यांची जबाबदारी झटकत, लॉकर हे नोटा ठेवण्यासाठी दागदागिने व दस्ताऐवज ठेवण्यासाठी आहे. बँकेने तक्रारकर्तीस पत्र देऊन विभागीय कार्यालयाला चौकशी करून खराब नोटा परत करण्यात येतील, असे सांगितले होते; परंतु नंतर तक्रारकर्तीची दखल घेतली नाही. बँकेने निष्काळजीपणा व सेवान्यूनता दाखविली. त्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष एस.एम. उंटवाले, सदस्य कैलास वानखडे, भारती केतकर यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर तक्रारकर्तीच्या बाजूने निर्णय देत, बँकेने तक्रारकर्तीस दोन लाख रुपयांच्या नोटा बदलून द्याव्यात आणि झालेला शारीरिक व मानससिक त्रास आणि न्यायिक खर्च म्हणून पाच हजार नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला. तक्रारकर्तीच्या बाजूने अँड. ए.के. सराग यांनी काम पाहिले.