शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्डसह बँक काढते प्रत्येक ग्राहकाचा विमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:00 IST

एटीएम कार्डधारकांस कार्ड देत असतानाच संबंधित  बँकेकडून त्या ग्राहकाचा  वीमा काढला जातो; मात्र याबाबतची माहिती  ग्राहकांना नसल्याने कुणी दावा करण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे  एटीएम विमा संदर्भात जनजागृती करण्याची आणि विमाप्रकरणी दावा  करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देविम्यासाठी बँक नियमावली, मात्र सवलतींपासून जनता बेदखल

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुंबईतील बँक लॉकर लुटल्याच्या घटनेतून बँक सुरक्षेचे अनेक  नियम आणि मिळत असलेल्या सुविधा समोर येत आहेत. ग्राहक  सुरक्षेच्या  दिशेने बँकेकडून दिल्या जाणार्‍या अनेक सेवा- सवलतींची माहिती सर्वसामान्य  नागरिकांना नाही. एटीएम कार्डधारकांस कार्ड देत असतानाच संबंधित  बँकेकडून त्या ग्राहकाचा  वीमा काढला जातो; मात्र याबाबतची माहिती  ग्राहकांना नसल्याने कुणी दावा करण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे  एटीएम विमा संदर्भात जनजागृती करण्याची आणि विमाप्रकरणी दावा  करण्याची गरज निर्माण झाली आहे.राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचे अनेक एटीएम कार्ड अलिकडे मोठय़ा  प्रमाणात वापरले जातात. त्यात डेबीट आणि क्रेडीट कार्ड या दोन वेगवेगळ्य़ा  सेवा आहेत. एटीएम कार्डधारक व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा अपघाती  मृत्यू झाल्यास त्याला एटीएमच्या विम्याचा लाभ घेता येतो. संबंधित एटीएम कार्ड असलेल्या बँकेकडून नियमानुसार अकस्मात घटनेतील नुकसान भरपाई  मिळू शकते. हक्काची विम्याची रक्कम अनेक जण मागत नाहीत. कारण  याबाबत अनेकांना माहिती नसल्याने असल्या प्रकारचे दावेच दाखल होत नाही त. यासंदर्भात ग्राहकाने आपल्या बँकेत जाऊन अथवा दूरध्वनीवरून माहिती  घ्यावी. जर ही माहिती बँकेकडून दिली जात नसेल तर ग्राहक न्यायालयात दाद  मागण्याची तरतूददेखील आहे.

काय म्हणतो नियम..एटीएम कार्डासोबतच ग्राहकाचा  विमा बँकेकडून काढला जातो. ५0  हजाराच्या रकमेपासून तर १0 लाखांच्या रकमेपर्यंत विमा काढलेला असतो.  यामध्ये हात-पाय गमाविल्याचा आणि जीव गमाविल्याचा वेगळा विमा मिळू  शकतो. साधे डेबीट एटीएम कार्ड, मास्टर कार्ड, प्लॅटीएम कार्ड, मास्टर  प्लॅटीएम कार्ड याप्रमाणे रकमेचा स्लॅब वाढविलेला असतो. एटीएम कार्ड  मागिल साठ दिवसांत उपयोगात आलेले असावे, बँक पासबुक खात्यात ताज्या  नोंदी असाव्यात, खाते निष्क्रिय किंवा बंद नसावे, असे नियम यासाठी लागू  आहेत.

विमा मिळविण्याचे दस्तावेजअपघाती मृत्यू झाल्यास एटीएम विम्याची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी  शवविच्छेदन प्रमाणपत्र, पोलीस रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, चालू असलेले  ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँकेचा अहवाल या दाव्यासाठी जोडणे आवश्यक  आहे. अपघाती अपंगत्व आल्यासदेखील त्या-त्या  विभागाचे संबंधित दस्तावेज  आवश्यक आहेत. एटीएम विम्याची रक्कम मिळविण्याचा दावा करण्याचे  प्रकरण अद्याप समोर आलेले नसल्याने याबाबत पाहिजे तसा प्रचार व प्रसार  झालेला नाही.

टॅग्स :atmएटीएमAkola cityअकोला शहरbankबँक