शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जेनेरिकच्या ८० औषधांवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:40 IST

अकोला - रुग्णांना स्वस्त औषध सेवा देणाऱ्या जेनेरिक औषधांमधील ८० औषधांचे प्रयोग धोकादायक असल्याच्या कारणावरुन हे औषध केंद्रीय आरोग्य विभागाच्या समितीने दिलेल्या अहवालानंतर बंद करण्यात आले आहेत.

- सचिन राऊत

अकोला - रुग्णांना स्वस्त औषध सेवा देणाऱ्या जेनेरिक औषधांमधील ८० औषधांचे प्रयोग धोकादायक असल्याच्या कारणावरुन हे औषध केंद्रीय आरोग्य विभागाच्या समितीने दिलेल्या अहवालानंतर बंद करण्यात आले आहेत. चार ते पाच ड्रग एकत्रित करून निर्मिती करण्यात आलेल्या या कॉम्बिनेशन औषधांचा वापर घातक असल्याने जेनेरिकच्या ८० औषधांची निर्मिती आणि विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.सर्दी, ताप, पोटदुखी, उलटी, सांधेदुखी या आजारावर जेनेरिक औषधं उपलब्ध असून, या औषधांचा प्रयोग करणे सुरक्षित नसल्याचे कें द्रीय आरोग्य विभागाच्या समितीमध्ये समोर आल्यानंतर या ८० जेनेरिक औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. फिक्स डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) असणाºया औषधांमध्ये अधिक प्रमाणात एॅन्टीबायोटीक औषधांचा समावेश असल्याने आणि यामधील काही औषधं शरीरासाठी धोकादायक असल्याने या औषधांवर बंदी लादण्यात आली आहे. एफडीसी अंतर्गत असलेल्या ३०० पेक्षा अधिक औषधांवर प्रतिबंध घालण्यात आले असून, त्यानंतर आता जेनेरिकच्या ८० औषधांवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. यामध्ये सर्दी, ताप, पोटदुखी, सांधेदुखी व उलटी यासारख्या औषधांचा समावेश आहे. स्वस्तात मिळत असलेली ही औषधे रुग्णांसाठी धोकादायक असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांनीही या औषधांची तपासणी सुुरू केली आहे. जेनेरिक मेडिकल स्टोअर्समधूनच ही औषधे मोठया प्रमाणात विक्री करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. जेनेरिक औषधांचा वार्षिक व्यवसाय हा तब्बल ९०० कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे. या व्यावसायावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. काय आहे फिक्स डोस कॉम्बिनेशनफिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांमध्ये चार ते पाच घटक असलेले ड्रग अ‍ॅन्टीबायोटीक म्हणून वापरण्यात येतात. विविध घटक एकत्रित करून सर्दी, ताप, पोटदुखीसह काही आजारांवर वापरण्यात येत असलेल्या औषधांमध्ये प्रमाणाचा अतिरेक होत असल्याने ते शरीरासाठी घातक ठरतात. त्यामुळे फिक्स डोस कॉम्बिनेशनच्या या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.

 जेनेरिक किंवा इतर कंपन्यांच्या कॉम्बिनेशन औषधांमध्ये काही धोकादायक घटक असल्याचे समोर आले आहे. या आधीदेखील औषधांवर बंदी होती; मात्र न्यायालयात प्रकरण प्रलंबित होते; मात्र आता न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने बंदी घातली आहे.- ह. य. मेतकरसहायक आयुक्त, औषध प्रशासन विभाग. 

 

टॅग्स :Akolaअकोलाgeneric Medicinesजेनरिक औषधं