शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाला आळा घालण्यासाठी अंगणवाडीमध्ये बालपंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 16:56 IST

अकोट : लहानपणीच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आदिवासीबहुल भागातील कुपोषणाला आळा बसावा, या उद्देशाने अकोट तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून बालपंगत हा अभिनव उपक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पाचपाटील यांनी सुरू केला आहे.

अकोट : लहानपणीच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आदिवासीबहुल भागातील कुपोषणाला आळा बसावा, या उद्देशाने अकोट तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून बालपंगत हा अभिनव उपक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पाचपाटील यांनी सुरू केला आहे.अकोट तालुक्यात १२६ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये बचत गटांमार्फत खिचडी, उसळ व इतर शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आदिवासीबहुल भागात कुपोषणाला आळा बसावा, त्यादृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ ९ फेब्रुवारी रोजी करतवाडी येथील अंगणवाडीतून करण्यात आला. गटविकास अधिकारी तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. पाचपाटील यांच्या संकल्पनेतून या बालपंगत उपक्रमामध्ये अंगणवाडी असलेल्या गावातील दानशूर व्यक्तींचा लोकसहभाग घेऊन अंगणवाडीमध्ये गोडधोड व सकस आहाराची बालपंगत दर आठवड्यात एक दिवस बसविण्यात येणार आहे. करतवाडी येथील पहिल्या बालपंगतीला बीडीओ पाचपाटील, करतवाडी ग्रा.पं.च्या सरपंच फरजाना खातून नसिरोद्दीन, उपसरपंच करुणा आग्रे, ग्रामसेवक आर. एम. राऊत, अंगणवाडी सेविका वनमाला कोकाटे, मदतनीस मंगला बोदडे, मिलिंद नितोने, सैयद अहमद, रोशन चिंचोळकर, नसिरोद्दीन, चेतन भारंबे, श्रीकांत कोकाटे, आदेश आग्रे, दीपक आग्रे, रोशन जामनिक, जुबेर खान, गणेश कोकाटे, आर. ए. रहेमान, अभिजित कोकाटे, राजेश डोंगरे, आशिष आग्रे, योगेश भारंबे, अजय आग्रे यांच्यासह गावकरी व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. या उपक्रमाकरिता करतवाडी येथील नीलेश आग्रे व किशोर आग्रे यांनी विशेष सहकार्य केले.लोकवर्गणीतून गणवेश उपलब्ध करणार!अंगणवाडीमधील विद्यार्थी वेगवेगळ्या पोशाखात येतात; परंतु हे विद्यार्थी कॉन्व्हेंटप्रमाणे एकाच गणवेशात यावेत, याकरिता लोकवर्गणीतून त्यांना गणवेश उपलब्ध करण्याची संकल्पना मांडत गटविकास अधिकारी बाबाराव पाचपाटील यांनी एक हजार रुपयांची मदत केली. गावातील इतरांनीसुद्धा मदत करून विद्यार्थ्यांना गणवेश देणार असल्याचे सांगितले.बालपंगत हा उपक्रम राबविण्याकरिता ग्रामीण भागात जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे, तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबविण्यात यावा, याकरिता प्रयत्न करण्यात येतील.- बाबाराव पाचपाटील, प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला 

 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट