शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेने मुदत ठेवीची रक्कम व्याजासह द्यावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:51 IST

अकोला : बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेने बाळापुरातील गुंतवणूकदार केतन वसंतराव पडधरिया यांची मुदत ठेवीची परिपक्व झालेली ४ लाख २४ हजार ७८0 एवढी  रक्कम व्याजासह परत द्यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य भारती केतकर, डब्ल्यू. व्ही. चौधरी यांनी दिला आहे. सदर आदेशामुळे या पतसंस्थेत गुंतवणूक केलेल्या शेकडो ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच न्यायालयाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेने बाळापुरातील गुंतवणूकदार केतन वसंतराव पडधरिया यांची मुदत ठेवीची परिपक्व झालेली ४ लाख २४ हजार ७८0 एवढी  रक्कम व्याजासह परत द्यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य भारती केतकर, डब्ल्यू. व्ही. चौधरी यांनी दिला आहे. सदर आदेशामुळे या पतसंस्थेत गुंतवणूक केलेल्या शेकडो ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तक्रारकर्ता वसंतराव पडधारिया यांनी २३ डिसेंबर १४ रोजी एक लाख रुपये १३ महिन्यांसाठी १२ टक्के व्याजाने मुदत ठेवीत पतसंस्थेत ठेवले. ही ठेव २३ जानेवारी रोजी परिपक्व झाली. दरम्यान, पतसंस्थेने २३ मे १६ रोजी मुदत वाढवून दिली. २२ मार्च रोजी १४ हजार व्याज दिले व मुदतपूर्वीवर १ लाख ४ हजार देणार होते. त्यानंतर ११ मे २0१५ रोजी, ७ हजार सुरुवातीला १३ महिन्यांकरिता १३ टक्के व्याजावर ठेवले. सदर रक्कम ११ जून २0१६ रोजी परिपक्व झाली व मुदतपूर्वीवर रुपये ७९८५ देणार होते. तसेच १३ मे १३ रोजी १ लाख २0 हजार सुरुवातीला १३ महिन्यांकरिता १३ टक्के व्याजावर ठेवले होते. त्यानंतर वेळोवेळी ही रक्कम रिनीवल केली. १३ ऑगस्ट २0१६ रोजी रक्कम परिपक्व होऊन १,७८,१७५ एवढी झाली. तिन्ही मुदत ठेवीची मुदतपूर्ती झाल्यानंतर तक्रारकर्त्याने वारंवार मागणी केली. याव्यतिरिक्त तक्रारकर्त्याने १३ ऑगस्ट १५ रोजी ७२ हजार, ७ ऑगस्ट १५ रोजी ९ हजार, २७ ऑगस्ट १५ रोजी ६ हजार, १७ ऑक्टोबर १५ रोजी ११ हजार, ३ नोव्हेंबर १५ रोजी १५ हजार आणि २२ डिसेंबर १५ रोजी ५ हजार अशी रक्कम पतसंस्थेकडेच जमा केली. ती परिपक्व रक्कम ४ लाख २४ हजार ७८0 एवढी झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनही पतसंस्थेने रक्कम परत केली नाही. तक्रारकर्त्याने रक्कम मिळविण्यासाठी नोटीस पाठविली; मात्र काहीएक परिणाम झाला नाही. त्यामुळे आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईसाठी ३0 मार्च १७ रोजी ग्राहक मंच येथे धाव घेतली. परिपक्व झालेल्या ४ लाख २४ हजार ७८0 रुपयांवर ३0 मार्चपासून नऊ टक्के व्याज, नुकसानभरपाई म्हणून पाच हजार आणि न्यायिक खर्चापोटी तीन हजार रुपये देण्याचे आदेशही ग्राहक मंचाने दिले आहे.

‘प्रत्येकाची रक्कम  परत मिळेल..’गुंतवणूक केलेल्या प्रत्येकाची रक्कम देण्यास पतसंस्था कटिबद्ध आहे. थकीतदारांकडे मोठी रक्कम थांबल्याने संस्था अडचणीत आहे. थकीतदारांच्या वसुलीतून संस्था अडचणीतून लवकरच बाहेर पडेल. पडधरियाप्रकरणी संस्थेने अपील दाखल केलेले आहे, अशी माहिती बाळापूर नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष, काँग्रेसचे माजी आमदार अँड.नातिकोद्दीन खतीब यांच्यावतीने श्याम शेगोकार यांनी दिली.

टॅग्स :Balapurबाळापूरbankबँक