शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

बालकुमार साहित्य संमेलन अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:32 IST

अकोला : विदर्भ साहित्य संघाने आपल्या प्रमुख वार्षिक साहित्य  संमेलनाव्यतिरिक्त विविध प्रवाही संमेलनेही आयोजित केली  आहेत. याच परंपरेत यंदा पाचवे बालकुमार साहित्य संमेलन  साने गुरुजी साहित्यनगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम  रोड, अकोला येथे १  व २ डिसेंबर रोजी आयोजित केले आहे. 

ठळक मुद्दे१ व २ डिसेंबर रोजी आयोजन शंकर कर्‍हाडे संमेलनाध्यक्ष पदी 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ साहित्य संघाने आपल्या प्रमुख वार्षिक साहित्य  संमेलनाव्यतिरिक्त विविध प्रवाही संमेलनेही आयोजित केली  आहेत. याच परंपरेत यंदा पाचवे बालकुमार साहित्य संमेलन  साने गुरुजी साहित्यनगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम  रोड, अकोला येथे १  व २ डिसेंबर रोजी आयोजित केले आहे. विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा ही संमेलनाची निमंत्रक  असून, प्रभात किड्स स्कूल ही संस्था प्रमुख आयोजक आहे.  सुप्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक शंकर कर्‍हाडे यांची  संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच अखिल भार तीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व प्रसिद्ध कवयित्री  तसेच बालसाहित्य लेखिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते  संमेलनाचे उद्घाटन होण्याचे निश्‍चित झाले आहे. बालसाहित्यासोबतच चित्रकला, बालनाट्य, संगीत, इंग्रजी बाल  साहित्य दालन पुस्तकांचे विक्री स्टॉल्स, अशी विविधांगी  कार्यक्रमांची व दालनांची रेलचेल या द्विदिवसीय बाल उत्सवात  राहणार आहे. विदर्भातील सर्वच शाळांना या संमेलनासाठी  निमंत्रित करण्यात येणार आहे. बाल प्रतिभेला वाव मिळावा,  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी, या दृष्टीने ह्या  संमेलनात अनेक उपक्रमांचे व स्पर्धांचेही आयोजन करण्यात  आले आहे. या बालकुमार साहित्य संमेलनास बालक व विद्या र्थी तसेच साहित्यप्रेमींनी भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन  विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेचे अध्यक्ष विजय कौसल,  कार्याध्यक्ष सीमा शेटे व सचिव डॉ. गजानन नारे आणि  कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे. 

संमेलनाध्यक्षांचा संक्षिप्त परिचय विदर्भ साहित्य संघाच्या पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे  अध्यक्ष शंकर कर्‍हाड हे बुलडाणा येथे स्थायिक असून, ख्या तनाम बालसाहित्यिक आहेत. ‘विदर्भाचे सानेगुरुजी’ म्हणून ते  ओळखले जातात. शंकर कर्‍हाडे यांना सतत तीन वेळा  चरित्रलेखनाबद्दल राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या कथासाहित्याचा समावेश पाठय़पुस्तक व विद्यापीठ  अभ्यासक्रमात आहे. त्यांना २0१0 चा राज्य शासनाचा उत्कृष्ट  वाड्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.आजपयर्ंत त्यांची ३३ पुस् तके प्रसिद्ध झालेली आहेत. ‘ओपन टू क्लोज’ या  बालनाटकासह अनेक कथा, लेख प्रकाशित आहेत.

प्रा. ललित काळपांडे यांची स्वागताध्यक्षपदी निवडअकोल्यातील शिक्षण क्षेत्रातील ललित ट्यूटोरियल्स संस्थेचे प्रा.  ललित काळपांडे यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात  आली आहे. या शिवाय संपूर्ण विदर्भातील अनेक बाल साहि ित्यक, सिने कलावंत, ज्येष्ठ साहित्यिक यांना संमेलनात निमंत्रित  करण्यात आले आहे. 

बालसाहित्यिकांना आवाहनविदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेच्या वतीने प्रभात  किडस्मध्ये होणार्‍या या संमेलनात ज्या बालसाहित्यिकांना या  संमेलनात सहभाग घ्यायचा असेल, त्यांनी किंवा त्यांचे पालक  अथवा शाळेचे शिक्षक यांनी संमेलन सरचिटणीस डॉ.सुहास  उगले  किंवा चिटणीस डॉ. विनय दांदळे यांच्याशी संपर्क  साधावा.