शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बाखराबाद हत्याकांड : तीन आरोपींची फाशी रद्द; मरेपर्यंत जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 11:36 IST

गजानन वासुदेव माळी, नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी अशी आरोपींची नावे असून ते उरळ, ता. बाळापूर येथील रहिवासी आहेत.

अकोला: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतीच्या वादातून चौघांचा निर्घृण खून करणाऱ्या तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. हे प्रकरण अकोला जिल्ह्यातील आहे.गजानन वासुदेव माळी, नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी अशी आरोपींची नावे असून ते उरळ, ता. बाळापूर येथील रहिवासी आहेत. राजेश, योगेश व विश्वनाथ माळी आणि वनमाला रोकडे अशी मयतांची नावे होती. राजेश व योगेश सख्खे भाऊ होते. विश्वनाथ हे त्यांचे काका होते तर, वनमाला चुलत बहीण होती. राजेश व योगेशचे वडील भगवंतराव यांनी आरोपी गजानन माळीसोबत दोन एकर शेती खरेदीचा करार केला होता. त्यानंतर गजाननने करार नाकारला. त्यामुळे भगवंतरावने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला असता त्यांना शेतीचा ताबा देण्यात आला. दरम्यान, १४ एप्रिल २०१४ रोजी मयत राजेश व योगेश शेतात गेले असता गजाननने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. परिणामी, योगेशने गजाननविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तेथून योगेश व राजेश हे बाखराबादला विश्वनाथकडे गेले. दरम्यान, राजेश घरीच थांबला तर, योगेश व वनमाला शेतात गेले. त्यांच्या पाठोपाठ आरोपीही शेतात गेले व त्यांनी कडबा कटरचे पाते व कुºहाडीने योगेश व वनमालावर सपासप वार करून त्यांना जागेवरच ठार केले. त्यानंतर तिन्ही आरोपी हे विश्वनाथच्या घरी गेले. त्या ठिकाणी आरोपींनी राजेश व विश्वनाथ यांचा खून केला. विश्वनाथची पत्नी पार्वती या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे.सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर ही शिक्षा कायम करण्यासाठी उच्च न्यायालयासमक्ष प्रकरण सादर केले होते.तसेच, आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने यावर एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर विविध बाबी लक्षात घेता हा सुधारित निर्णय दिला. आरोपींतर्फे अ‍ॅड. अविनाश गुप्ता व अ‍ॅड. आकाश गुप्ता तर, सरकारतर्फे अ‍ॅड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी