शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ  

By रवी दामोदर | Updated: April 13, 2024 18:12 IST

...या अंतर्गत रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या आजीबाईंनी पहिला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील ७२६ दिव्यांग व ८५ वर्षांपुढील १ हजार ६३२ मतदार अशा एकूण २ हजार ३५८ मतदारांना गृह मतदानाची सुविधा देण्यात आली असून, त्याचा प्रारंभ शनिवार, दि. १३ एप्रिलपासून झाला आहे. या अंतर्गत रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या आजीबाईंनी पहिला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

अकोला लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाची सुरूवात रिसोड तालुक्यातून झाली. गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून, स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहे. ही मतदान पथके मतदाराच्या घरी पोहोचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेमुळे दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या तारखांना होणार मतदानासाठी गृहभेटीरिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी  गृह भेटीचा दि.१३ व १५ एप्रिल आहे किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दि.१८ एप्रिल असा आहे. अकोट विधानसभा मतदारसंघ, तसेच अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दि.१८ व १९ एप्रिल किंवा आवश्यकता वाटल्यास २२ एप्रिल असा आहे. बाळापूर मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दि. १५ व १६ एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास १९ एप्रिल असा आहे. अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दि. १५ व १६ एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दि. २० व २१ एप्रिल असा आहे. मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दि.१८ व १९ एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दि. २१ व २१ एप्रिल असा आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील सर्व दिव्यांग व ८५ वर्षांपुढील मतदारांनी नमूद दिनांकास घरी राहून निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

गृह मतदानासाठी दिव्यांग व वृद्ध मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मतदान यंत्रणा घरी येण्याच्या तारखा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या तारखांना घरी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा- अजित कुंभार, निवडणूक निर्णय अधिकारी. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकVotingमतदान