शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बाळापुरातील कचरा फेकला जातो नदी पात्रात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 20:43 IST

नगर परिषदेमार्फत शहरातील घनकचरा उचलण्यासाठी मागील  वर्षीपेक्षा दुप्पट दराने निविदा दिल्यावरही कचरा नदी काठावर मोठय़ा प्रमाणात  टाकण्यात येत असल्याने प्रदूषण होत आहे. घनकचर्‍याच्या दुर्गंधीने डासांची उ त्पत्ती वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

ठळक मुद्देनगरपालिकेने कचरा उचलण्यासाठी दुप्पट दराने दिली निविदा

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर - नगर परिषदेमार्फत शहरातील घनकचरा उचलण्यासाठी मागील  वर्षीपेक्षा दुप्पट दराने निविदा दिल्यावरही कचरा नदी काठावर मोठय़ा प्रमाणात  टाकण्यात येत असल्याने प्रदूषण होत आहे. घनकचर्‍याच्या दुर्गंधीने डासांची उ त्पत्ती वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील घनकचरा उचलण्यासाठी मायक्रो इन्वहॉर्मेंट सोल्युशन प्रा.लि.  नाशिक यांना दरमहा ४ लाख ५0 हजार रुपये नगर परिषदेमार्फत दिले जातात.  मागील वर्षी सचिन शर्मा बाळापूर यांना दरमहा २ लाख २९ हजार ६00 रु.  देण्याचे कंत्राट दिले होते. नगर परिषदेने शासकीय आय.टी.आय.च्या मागील  जागेत घनकचरा जमा करून खतनिर्मिती करण्यासाठी शासनाकडून मोठय़ा  निधीतून केवळ मशिनरी बसवण्यात आली. तिचा कुठलाही उपयोग खतनिर्मि तीसाठी झाला नाही. घनकचर्‍यापासून खत निर्मिती व घनकचर्‍याची योग्य  विल्हेवाट लावण्यात येईल. यासाठी शासनाने मोठा निधी दिला; परंतु या  निधीचाही दुरुपयोग होत आहे. घनकचरा कंत्राटदार संबंधित घनकचरा  साइटवर न टाकता नदी काठाने टाकत असल्याने नगर परिषदेचा पैसा पाण्यात  जात आहे. घनकचर्‍यापासून खत निर्मिती झाल्यास शेतकर्‍यांसाठी लाभाचा ठरेल व नगर  परिषदेचेही उत्पन्न वाढणार आहे. मात्र, याकडे नगर परिषदेचे पदाधिकारी,  अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. शहराच्या दोन्ही बाजूंनी नदी काठावर  कचर्‍याचे मोठ-मोठे ढीग कालेखानीपुरा, ब्राम्हणवेस, मोमीनपुरा, कसाईवेस  बाजारपेठ , बारादारी अनिकट, कासारखेड, बौद्धधर्मीय स्मशानभूमी, अशा  अनेक ठिकाणी कंत्राटदाराचे कर्मचारी कचरा फेकत आहेत. या ठिकाणी  बर्‍याच वेळा हा कचरा पेटवून देऊन नष्ट केला जातो. त्यामुळे, नागरिकांना  प्रदूषणाचा सामना करावा लागतो. घनकचर्‍यामुळे शहरातील प्रदूषणात मोठी  वाढ झाली आहे. नदी काठावर मोठ-मोठे कचर्‍याचे ढीग वाढत आहेत.  काठावरील घनकचरा नदीपात्रात जाऊन नदीपात्रात घाण वाढत आहे. याच  घाणीची दुर्गंधी पसरत आहे. मोठय़ा प्रमाणात डासांचा उच्छाद वाढून  शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

शहरातील घनकचरा उचलून, त्यासंबंधित कंत्राटदाराला नियोजित खतनिर्मिती  साईटवर नेऊन टाकण्याचा करार आहे. वारंवार कंत्राटदाराला कचरा  शहराच्या आसपास टाकू नये, अशा सूचना लेखी पत्र देऊन दिल्या जातात.  त्यावरही कत्राटदार नदीकाठावर कचरा टाकत असल्यास कारवाई करू.-जी.एस. पवार, मुख्याधिकारी न.प. बाळापूर

शहरातील घनकचरा अर्धवट उचलून तो शहराबाहेर न नेता मन नदीच्या  लोटणापूरनजीक दलित वस्ती निधीतून बांधलेल्या रस्ता संरक्षण भिंतीच्यामध्ये  टाकत आहे. बौद्धधर्मीय स्मशानभूमीतही घनकचरा टाकण्यात येत आहे. नगर  परिषद प्रशासनाने दखल न घेतल्यास भारिप-बमसं व नागरिकाच्यावतीने जन  आंदोलन उभारू.- नितीन उमाळे, शहर अध्यक्ष भारिप-बमसं बाळापूरफोटो आहे 

टॅग्स :Balapurबाळापूर