शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान भारत योजना; लाभार्थींची नावे सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 10:29 IST

काही नागरिकांच्या नावांचा यादीत समावेश असला तरी शेजारच्या नागरिकांचा यादीत समावेश नसल्याचे दिसून आले.

अकोला: शहरात मागील सात दिवसांपासून आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ‘गोल्डन कार्ड’च्या नोंदणीसाठी विविध प्रभागांमध्ये नगरसेवकांच्या स्तरावर शिबिराचे आयोजन केले जात आहे. २०११ मध्ये आशा स्वयंसेविकांनी सर्व्हे व नोंदणी केलेल्या लाभार्थींच्या नावांचा समावेश आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्राह्य धरल्या जात असल्याचा दावा नगरसेवकांच्या स्तरावर केला जात असला तरी सदर याद्यांमधून बहुतांश नागरिकांची नावे गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभागातील लाभार्थींची नावे शोधताना नगरसेवकांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे.आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रति कुटुंबातील व्यक्तीला कोणत्याही स्वरूपाचा आजार झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी ५ लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. योजनेंतर्गत विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करता येणार आहेत. त्यासाठी शासनाने प्राधिकृत केलेल्या शासकीय, खासगी हॉस्पिटलमध्ये संबंधित रुग्णावर मोफत उपचार केले जातील. दरम्यान, या योजनेसाठी २०११ मध्ये आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन सर्व्हे करीत कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावाची नोंदणी केल्याचा दावा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपने सदर योजने अंतर्गत यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थींच्या नावाने ‘गोल्डन कार्ड’ तयार करण्यासाठी शिबिरांचे शहरात ठिकठिकाणी आयोजन केले. प्रत्यक्षात नगरसेवकांना प्राप्त याद्यांमधून अनेक नागरिकांची नावे गहाळ झाल्याचे समोर आले आहे. एकाच प्रभागात तसेच एकाच गल्लीबोळात राहणाºया काही नागरिकांच्या नावांचा यादीत समावेश असला तरी शेजारच्या नागरिकांचा यादीत समावेश नसल्याचे दिसून आले.सर्व्हे नेमका झाला कधी?नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले. यावेळी आशा सेविकांनी २०११ मध्ये केलेल्या सर्व्हेचा दावा केला जात असला तरी २००६-०७ मध्ये अशा प्रकारचा सर्व्हे झाल्याचे बोलल्या जात आहे. त्यानंतर दहा वर्षांनंतर अर्थात २०१७ मध्ये असा सर्व्हे पुन्हा होणे अपेक्षित होते. त्यामुळे हा सर्व्हे नेमका झाला कधी, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.दुसरा सर्व्हे कधी; नगरसेवकांची चुप्पीज्या नागरिकांची नावे यादीत आढळून आली नाहीत, त्यांच्या नावांचा दुसºया सर्व्हेत समावेश केला जाईल, असा आशावाद नगरसेवकांकडून दाखवण्यात आला; परंतु हा दुसरा सर्व्हे कधी होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला असता त्यावर नगरसेवकांनी चुप्पी साधणे पसंत केले आहे.

नगरसेवकांची शोधाशोधनगरसेवकांकडे उपलब्ध असलेल्या याद्यांमध्ये प्रभागांशिवाय चक्क दुसऱ्या तालुक्यातील लाभार्थींच्या नावाचा समावेश असल्याचे दिसून आले. शिबिरामध्ये ‘गोल्डन कार्ड’मिळेल या अपेक्षेने गेलेल्या नागरिकांची नावे शोधताना नगरसेवकांची चांलगीच दमछाक झाली. यादीत नावाचा समावेश नसल्यामुळे गरजू नागरिकांचा हिरमोड झाला.

 

टॅग्स :Akolaअकोलाayushman bharatआयुष्मान भारत