शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

अकोल्यात ‘आयुष्यमान भारत’ योजना कार्ड अभियान प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:33 IST

अकोला : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘आयुष्यमान भारत’ ई-कार्ड नोंदणीला सोमवार, २४ जूनपासून अकोल्यात प्रारंभ होत आहे.

अकोला : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘आयुष्यमान भारत’ ई-कार्ड नोंदणीला सोमवार, २४ जूनपासून अकोल्यात प्रारंभ होत आहे. योजनेंतर्गत कार्ड प्राप्त रुग्णांना तब्बल १ हजार २४२ आजारांवर उपचार घेणे शक्य होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात २९ जूनपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य आयुष्यमान भारत योजनेंतर्गत लाभार्थींना जलद गतीने लाभ मिळावा, यानुषंगाने सोमवारपासून अकोल्यात ई-कार्ड नोंदणीला सुरुवात होत आहे. २९ जूनपर्यंत चालणाऱ्या या विशेष मोहिमेच्या माध्यमातून लाभार्थींना आधार कार्ड दाखवून ई-कार्ड मिळविता येणार आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड असेल, त्यांना आरोग्य विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. यासाठी लाभार्थींना कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच जवळपासच्या सेतूवर नोंदणी करावी लागणार आहे. कार्डधारकांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे ११२२ सर्जिकल आणि मेडिकल उपचार मान्यता प्राप्त खासगी आणि शासकीय रुग्णालयांमार्फत उपलब्ध होणार आहेत.जिल्ह्यातील लाभार्थी कुटुंब संख्याग्रामीण            शहरी१,६०,४०० -   ५१,४८४लाभार्थी कोण?ग्रामीणघराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावती व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी सात वर्गातील कुटुंबांचा समावेश आहे.शहरीकचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर कारागीर इत्यादी ११ वर्गातील कुटुंबांचा समावेश प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे.बालरोग शल्यक्रियेत १५ हजारांचा फरकमहात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत ९७१, तर आयुष्यमान भारत योजनेत १३४९ आजारांवर उपचारांचा समावेश आहे. या दोन्ही योजनांमधील ५८१ उपचार पद्धती सारख्याच आहेत. आयुष्यमान भारत योजनेचे पॅकेज जनआरोग्य योजनेच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी कमी आहे. विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी बालरोग शल्यक्रियेचे पॅकेज ३० हजारांचे आहे, तर मध्य प्रदेशातील रुग्णांसाठी हे पॅकेज आयुष्यमान भारत योजनेत १५ हजारांचे आहे.२५ ते ३० टक्क्यांचा फरकराज्यात राबविण्यात येणाºया महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतील पॅकेजच्या तुलनेत साधारणत: २५ ते ३० टक्क्यांची तफावत आहे.जिल्ह्यात सोमवार, २४ जून ते २९ जून या कालावधीत आयुष्यमान भारत ई-कार्ड मोहीम राबविण्यात येणार आहे. गरजूंनी या संधीचा लाभ घेऊन नोंदणी करावी.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाayushman bharatआयुष्मान भारत