शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅर्थरायटीस’बाबत अशास्त्रीय उपचार टाळावे -  डॉ. संजय शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:21 IST

रोगाच्या उत्पत्तीकडे लक्ष न दिल्याने रोग आटोक्यात न येता वाढत जातो. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक आहे, असे मत अकोल्यातील आॅर्थरायटीस तज्ज्ञ डॉक्टर संजय शिंदे यांनी व्यक्त केले.

संजय खांडेकरअकोला : आॅर्थरायटीस (संधिवात) संदर्भात समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात अशास्त्रीय आणि अघोरी उपचार केले जातात. रोगाच्या उत्पत्तीकडे लक्ष न दिल्याने रोग आटोक्यात न येता वाढत जातो. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक आहे, असे मत अकोल्यातील आॅर्थरायटीस तज्ज्ञ डॉक्टर संजय शिंदे यांनी व्यक्त केले. शुक्रवार, १२ आॅक्टोबर रोजी असलेल्या जागतिक आॅर्थरायटीस दिनानिमित्त डॉ. शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला विशेष संवाद.प्रश्न : आॅर्थरायटीस म्हणजे नेमके काय?उत्तर : विविध प्रकारच्या सांध्यांचे आणि मणक्यांचे विकार आणि त्यापासून उद्भवणाऱ्या रोगांना आॅर्थरायटीस म्हटले जाते. शरीररचनेतील सांध्यांची संरचना बिघडल्याने हा रोग होतो. अपघाती हाड मोडल्याने, वाढत्या वयात हाडांची झीज झाल्याने, आॅर्थरायटीस होतो. वयाच्या चाळिशीनंतर गुडघ्यांची झालेली झीज, वाढत्या वजनामुळे आलेला दबाव आल्यामुळेही रोग होऊ शकतो.प्रश्न : आॅर्थरायटीस कशामुळे होतो, त्याचे प्रकार किती?उत्तर : आॅर्थरायटीस म्हणजे संधिवात. ५० पेक्षाही जास्त प्रकारचे संधिवात आढळून आले आहेत. संधिवात अनेकदा आनुवंशिक आढळतो. शरीररचनेतील नैसर्गिक सांध्यांचा उपयोग चुकीच्या पद्धतीने केल्यास रोग वाढतो. हाडांमधील ढिसूळता, आतड्यातील काही रोग आणि एखाद्या संसर्गजन्य रोगामुळे विविध प्रकारचे वात उद्भवतात.प्रश्न : आॅर्थरायटीसची लक्षणे आणि अद्ययावत उपचार पद्धती कोणत्या?उत्तर : शरीरसंरचनेच्या हाडांच्या जाइंटमध्ये दुखणे, जॉइंट लॉक होणे, सुजन येणे, पाणी भरणे, हाडांचा आकार बदलत जाणे ही प्राथमिक आॅर्थरायटीसची लक्षणे आहेत. संधिवातावर अनेक वैद्यकीय पॅथीतून उपचार केले जातात. अ‍ॅलोपॅथीमध्ये औषधोपचारापासून तर शस्त्रक्रियापर्यंत उपचार केले जातात.प्रश्न : आॅर्थरायटीसच्या निदानासाठी कोणत्या तपासण्या गरजेच्या आहेत?उत्तर : जर उपरोक्त लक्षणे दिसत असतील, तर रक्त, एचएलए, युरीक अ‍ॅसिड आणि ‘एमआरआय’च्या तपासणीतून आॅर्थरायटीसचे निदान केल्या जाते.प्रश्न : आॅर्थरायटीस होऊ नये, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?उत्तर : आॅर्थरायटीस होऊ नये, यासाठी आहारासोबत स्नायूंचा नियमित व्यायाम आवश्यक आहे. दारू, तंबाखू, सिगारेट-विडीचे सेवन, अतिनॉनव्हेज टाळावे, शरीरसंरचनेतील सांध्यांची नियमित नैसर्गिक पद्धतीने हालचाल होईल, असे व्यायाम करावे, वज्रासन किंवा नमाज अदा करण्यासारखी बैठक जास्त नसावी, उंचीनुसार वजन आटोक्यात ठेवावे, ही काळजी घेतली, तर आॅर्थराटीसपासून आपण दूर राहू शकतो.

 

टॅग्स :Akolaअकोलाdoctorडॉक्टरHealthआरोग्य