शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला भाडे देण्यास टाळाटाळ; मिनी मार्केटच्या भाडेकरूंना 'अल्टिमेटम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:44 IST

भाडे देण्यासही टाळाटाळ करणाऱ्या चार भाडेकरूंना ४ जून २०१९ पर्यंत नव्याने भाडेकरार करण्याचा अल्टिमेटम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

अकोला: जिल्हा परिषदेच्या मालकीची दुकाने नाममात्र भाड्याच्या मोबदल्यात पदरात पाडून घेतलेल्यांनी ती पुन्हा इतरांना भाड्याने दिली. या प्रकरणी काहीच कारवाई झाली नसताना भाडे देण्यासही टाळाटाळ करणाऱ्या चार भाडेकरूंना ४ जून २०१९ पर्यंत नव्याने भाडेकरार करण्याचा अल्टिमेटम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे. त्यामध्ये दुकानांची खिरापत लाटलेल्या बड्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेने सिव्हिल लाइन परिसरातील विश्रामगृहालगतच्या रस्त्याच्या बाजूने व्यावसायिक हेतूने दुकानांची निर्मिती केली. नाममात्र भाड्याच्या मोबदल्यात ती दुकाने तत्कालीन राजकारणी, त्यांचे नातेवाईक, मित्र परिवाराच्या घशात घालण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेला नाममात्र म्हणजे प्रतिमहिना ४५०, त्यानंतर १,२०० रुपये भाडे देत तेच दुकान पोटभाडेकरूला बाजारभावापेक्षाही अधिक भाड्याने देत कमाईचा बिनभांडवली स्रोत निर्माण केला. नियमानुसार मालमत्तेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील सर्वच सदस्यांना अंधारात ठेवून निवडक सदस्यांनी घेतलेला ठराव व त्यानुसार अधिकाऱ्यांनी करारनामे केले. विशेष म्हणजे, केवळ स्थायी समितीच्या ठरावाच्या आधारे करारनामे केले. त्याचवेळी सर्वसाधारण सभेने स्थायीचा ठरावच रद्द करण्याचा ठराव घेतला. या दोन्ही परस्परविरोधी ठरावानुसार हा मुद्दाच वादाचा झाला. त्याचा फायदा दुकाने लाटणारांनाच अधिक होत आहे.दरम्यान, न्यायालयीन प्रकरणांतील भाडेकरूंसोबत १२ एप्रिल २०१९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चर्चा केली. त्यामध्ये २०१४-१५ या वर्षाचे भाडे देण्यासाठी नवीन करारनामा करणे, त्यानंतर पुढील कालावधीसाठी ४ जून २०१९ रोजी नव्याने करारनामा करण्याचे मान्य केले आहे. त्यापूर्वी अगदी नाममात्र भाड्याने दुकाने ताब्यात घेतलेल्यांनी जिल्हा परिषदेच्या दुकानांच्या माध्यमातून चांगलेच उखळ पांढरे केले आहे. नव्या करारनाम्यात आता ६,७०० रुपये प्रमाणे भाडे देण्याची तयारी करावी लागणार आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद