शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याभरात सरासरी २०० युनिटनी घटले रक्त संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:45 IST

अकोला : उन्हाची वाढती तीव्रता अन् सुट्ट्यांमूळे महाविद्यालयीन रक्तदान शिबिरांना ब्रेक लागल्याने रक्त संकलनाची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी गत महिनाभरात सरासरी २०० युनिटनी रक्तसंकलन घटले आहे.

अकोला : उन्हाची वाढती तीव्रता अन् सुट्ट्यांमूळे महाविद्यालयीन रक्तदान शिबिरांना ब्रेक लागल्याने रक्त संकलनाची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी गत महिनाभरात सरासरी २०० युनिटनी रक्तसंकलन घटले आहे. उन्हाची तिव्रता आणखी वाढणार असल्याने एप्रिल व मे महिन्यात रक्त संकलनाचे प्रमाण आणखी घटण्याची शक्यता आहे.साधारणत: एका रक्तपेढीमध्ये महिन्याला एक हजार युनिट रक्त संकलीत केले जाते. शहरात शासकीय व खासगी अशा एकूण पाच ते सहा रक्तपेढ्या आहेत. त्यामुळे रुग्णांना रक्ताची चणचण भासत नाही. परंतु, उन्हाळा लागला की रुग्णांना ऐन वेळी रक्त मिळत नाही. कारण, उन्हाळ््यात रक्तदात्यांची संख्या झपाट्याने कमी होत जाते.शिवाय, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरांनाही ब्रेक लाकतो. मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, त्याचा परिणाम रक्तसंकलनावरही दिसून येत आहे. शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त संकलनाचे प्रमाण कमी होत असून, महिनाभरातच सरासरी २०० युनिटनी रक्त संकलन कमी झाले आहे. हे प्रमाण एप्रिल व मे महिन्यात आणखी घटणार असून, केवळ ५०० ते ६०० युनिट संकलित होण्याची शक्यता आहे.व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची महत्त्वाची भूमिकाउन्हाळ््यात रक्त संकलनाचे प्रमाण घटल्याने ऐन वेळी रुग्णाला रक्त मिळत नाही. अशा परिस्थितीत व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून जुळलेल्या रक्तदात्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची उपलब्धता नसली, तरी अशा रक्तदात्यांच्या माध्यमातून रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यास मदत होईल.रक्ताचा बाजार होण्याची शक्यतामर्यादीत रक्त संकलनामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रक्तासाठी फिरावे लागते. परंतु, ऐन वेळेवर रक्त न मिळाल्याचे पाहून या काळात रक्ताचे दलाल सक्रिय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यापूर्वी सर्वोपचार परिसरात रक्त मिळवून देतो म्हणून रक्ताचा बाजार करणाऱ्यांचे पितळ उघडे झालेले आहे. हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनासोबतच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.उन्हाळ््यामुळे बहुतांश लोक रक्तदान करण्यास टाळाटाळ करतात. शिवाय या काळात महाविद्यालयांमध्ये होणारे रक्तदान शिबिर बंद झाल्याने रक्त संकलनात कमी येते. परंतु, रक्तदात्यांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा.- डॉ. बाळकृष्ण नामधारी, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयBlood Bankरक्तपेढी