शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता व्यवस्थापन समितीकडे स्वायत्त संस्थांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:50 IST

बहुतांश स्वायत्त संस्थांनी या समितीचे गठनच केले नसल्याची माहिती आहे.

अकोला: राज्य शासनाने जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे गठन करून नोंदवही (पीबीआर) तयार करण्याचे राज्यातील स्वायत्त संस्थांना निर्देश दिले होते. समितीचे गठन केल्यानंतर संबंधित कार्यवाही पूर्ण न केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना दर महिन्याला १० लाख रुपये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे स्पष्ट निर्देश होते. नोंदवही (पीबीआर)तर सोडाच, बहुतांश स्वायत्त संस्थांनी या समितीचे गठनच केले नसल्याची माहिती आहे. याप्रकरणी कें द्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. हवा, पाणी प्रदूषित होऊन त्याचा परिणाम जैवविविधतेवर होत असल्याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने स्वायत्त संस्थांच्या स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समिती गठित करण्याचे निर्देश जारी केले. यामध्ये प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणारे प्रदूषण व पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांसह विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. स्वायत्त संस्थांनी अनुसूचित जाती-जमातीमधील महिला सदस्य, वन विभाग प्रतिनिधी, पदसिद्ध कृषी विभाग प्रतिनिधी, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, मत्स्य व्यवसाय, आदिवासी विकास विभाग आदी विभागातील प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश करण्याचे निर्देश आहेत. समितीचे गठन केल्यानंतर ३१ जानेवारी २०२० पर्यंत जैवविविधता नोंदवही (पीबीआर) तयार करणे क्रमप्राप्त होते. स्वायत्त संस्थांच्या स्तरावर अद्यापही समित्यांचे गठनच केले नसल्याचे समोर आले आहे.समिती कागदावर!शासकीय कार्यालयांमध्ये वरिष्ठांकडून अधिनस्त महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचे ध्यानात घेऊन शासनाने विशाखा समितीचे गठन करण्याचे निर्देश दिले होते. जैवविविधता व्यवस्थापन समितीचा उद्देश लक्षात घेता स्वायत्त संस्थांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्याने शासनाच्या अनेक समित्या कागदांवर राहत असल्याची परिस्थिती आहे.