शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Akola Municipal Corporation : 'फोर-जी'च्या २४ कोटींच्या रकमेवर सत्ताधाऱ्यांचा डोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 11:09 IST

Akola Municipal Corporation : सोळा कोटी रुपयांची मागणी नगरसेवकांकडून केली जाणार असल्याची माहिती आहे.

अकोला: शहरात महापालिकेच्या परवानगीशिवाय अनधिकृत भूमिगत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाºया एका मोबाइल कंपनीने मनपाकडे जमा केलेल्या २४ कोटी रुपयांच्या रकमेवर सत्ताधाºयासह सर्वपक्षीय नगरसेवकांचा डोळा असून, या रकमेतून प्रभागातील विकास कामांसाठी चक्क सोळा कोटी रुपयांची मागणी नगरसेवकांकडून केली जाणार असल्याची माहिती आहे. तसे झाल्यास कर्मचाºयांच्या थकीत वेतनाची समस्या कायम राहणार असल्याची शक्यता आहे.शहरवासीयांना फोर-जी सुविधा देण्याच्या नावाखाली मोबाइल कंपनीच्यावतीने महापालिकेची परवानगी न घेता शहराच्या विविध भागात अनधिकृतपणे भूमिगत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार 'लोकमत'ने उघडकीस आणला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी संबंधित कंपनीवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना दिले होते. त्यानुषंगाने मनपाच्या बांधकाम विभागाने भूमिगत केबलची तपासणी केली असता, चक्क ३९ किलोमीटर अंतराचे अनधिकृत केबल आढळून आले होते. याप्रकरणी महापालिका व रिलायन्स कंपनीच्यावतीने संयुक्त तपासणी केली असता, हा घोळ उजेडात आला. दरम्यान, याप्रकरणी मनपा प्रशासनाने कंपनीला २४ कोटी रुपये दंड जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कंपनीच्यावतीने ही रक्कम प्रशासनाकडे जमा करण्यात आली. दरम्यान, एकीकडे कोरोना विषाणूच्या अनुषंगाने अकोलेकरांनी मालमत्ता कर जमा करण्यास हात आखडता घेतल्याची परिस्थिती आहे. त्याचा परिणाम कर वसुलीवर झाला असून, मनपाला अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नसल्यामुळे कर्मचाºयांच्या वेतनाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कंपनीने दंडापोटी जमा केलेली २४ कोटी रुपयांची रक्कम थकीत वेतन तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी खर्च करण्याची मागणी विविध कर्मचारी संघटनांच्यावतीने लावून धरण्यात आली आहे. अशा स्थितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनीसुद्धा प्रभागातील प्रलंबित विकासकामांसाठी प्रशासनाने किमान १६ कोटी रुपये द्यावेत, यावर खलबते सुरू केल्याची माहिती आहे. अशा स्थितीमध्ये मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला