शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

 अकोला जिल्ह्यातील ९०२ सहकारी संस्थांचे ‘आॅडिट ’पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 14:06 IST

अकोला: जिल्ह्यातील विविध १ हजार ५२ सहकारी संस्थांपैकी ९०२ सहकारी संस्थांचे सन २०१७ मध्ये लेखापरीक्षण (आॅडिट) पूर्ण करण्यात आले असून, १५० सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण केले नसल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये एकूण १ हजार ६२ सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये सेवा सहकारी संस्था, नागरी कर्मचारी सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी बँका, औद्योगिक, मजूर व सुशिक्षित बेरोजगार व इतर सहकारी संस्थांचा समावेश आहे. ९०२ सहकारी संस्थांनी सन २०१७ या वर्षात लेखापरीक्षण केले आहे. उर्वरित १५० सहकारी संस्थांनी मात्र लेखापरीक्षण केले नाही.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील विविध १ हजार ५२ सहकारी संस्थांपैकी ९०२ सहकारी संस्थांचे सन २०१७ मध्ये लेखापरीक्षण (आॅडिट) पूर्ण करण्यात आले असून, १५० सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण केले नसल्याची माहिती समोर आली आहे.सहकार विभागांतर्गत नोंदणी केलेल्या विविध सहकारी संस्थांनी दरवर्षी मार्च अखेरपर्यंत संस्थेचे लेखापरीक्षण (आॅडिट) करणे आवश्यक असते. अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात तालुक्यांमध्ये एकूण १ हजार ६२ सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये सेवा सहकारी संस्था, नागरी कर्मचारी सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी बँका, औद्योगिक, मजूर व सुशिक्षित बेरोजगार व इतर सहकारी संस्थांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १ हजार ५२ सहकारी संस्थांपैकी ९०२ सहकारी संस्थांनी सन २०१७ या वर्षात लेखापरीक्षण केले आहे. उर्वरित १५० सहकारी संस्थांनी मात्र लेखापरीक्षण केले नसल्याची बाब जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडे प्राप्त अहवालात समोर आली आहे.‘आॅडिट’मध्ये ‘या’ बाबींची करण्यात आली तपासणी!जिल्ह्यातील ९०२ सहकारी संस्थांचे ‘आॅडिट’ करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने सहकारी संस्थांकडून करण्यात आलेली सहकार धोरणांची अंमलबजावणी, सहकार कायद्याचे उल्लंघन, संस्थेचे झालेले आर्थिक व्यवहार, आर्थिक नफा-तोटा अंदाजपत्रक, संस्थेचे कर्जवाटप, व्याजाची वसुली, मासिक सभा व इतर बाबींची तपासणी करण्यात आली.१५० सहकारी संस्थांना नोटीस!‘आॅडिट’ केले नसल्याने, जिल्ह्यातील १५० सहकारी संस्थांना संस्था बंद का करण्यात येऊ नये, अशा प्रकारची नोटीस जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील सातही तालुका उपनिबंधक कार्यालयामार्फत संबंधित संस्थांना बजावण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण