शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून वेधले लक्ष!

By संतोष येलकर | Updated: July 15, 2023 19:18 IST

प्राथमिक शिक्षक समितीने दिले धरणे

अकोला: प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शनिवार १५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यात यावी, यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

पेन्शनच्या मागणीसह जिल्हा परिषद शिक्षकांसाठी कार्यरत गावांत निवासस्थान उपलब्ध होइपर्यत मुख्यालयी निवासाची सक्ती करण्यात येवू नये, मुख्यालयी निवासाच्या नावाखाली घरभाडे भत्ता बंद करण्यात येवू नये, सातवा वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम देण्यात यावी, रजा वेतन, वैद्यकीय प्रतीपूर्ती , प्रवासभत्त्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे, महानगरपालिका, नगरपालिका प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाने शंभर टक्के अनुदान द्यावे, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात यावी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या रिक्त जागी कंत्राटी शिक्षणसेवकांची नेमणूक करण्याची पध्दत बंद करण्यात यावी आदी विविध प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरण एक दिवसीय धरणे देण्यात आले.

विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, मारोती वरोकार, अरविंद गाडगे, प्रशांत आकोत, गोपाल सुरु, नागेश सोळंके, दिनेश बाेधनकर, संतोष काळणे, राजेश कराळे, गणेश रावरकर, विजय टोहरे, अरुण वजिरे, विकास राठोड, निलेश कवडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकAkolaअकोला