शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सर्वोपचार रुग्णालयातून बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न; चौकशी समिती गठित

By atul.jaiswal | Updated: November 17, 2017 17:54 IST

नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून स्तनदा मातेकडून तिच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुरुवार, १७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शुक्रवारी एक त्रिसदस्यी समिती गठित केली.

ठळक मुद्देसोमवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून स्तनदा मातेकडून तिच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुरुवार, १७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शुक्रवारी एक त्रिसदस्यी समिती गठित केली.गुरुवारी दुपारी जुनिसीया असे स्वत:चे नाव सांगत असलेल्या एका परप्रांतीय वेडसर महिलेने सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील वार्ड क्र. २३ मध्ये असलेल्या ‘एनआयसीयू’मध्ये प्रवेश करून सोनू संदीप अंबडारे (२६, रा. नागापूर-बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला)यांच्याकडून त्यांच्या २१ दिवसांच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केला होता; परंतु कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिका जया खांबलकर आणि सुरक्षा रक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडला व तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. सर्वोपचार रुग्णालयाची कडक सुरक्षा व्यवस्था भेदून घडलेल्या या प्रकाराची वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. घडलेला प्रकार अतीशय गंभीर असल्यामुळे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनेश नेताम यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत केली. या समितीमध्ये बालरोग चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. अभय बागुल व मेट्रन ग्रेसी मरियम यांचा समावेश आहे. येत्या सोमवार, मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे प्रभारी अधिष्ठा डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय