शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

वाहकाकडील तिकिटांचे पैसे लंपास करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 20, 2016 01:34 IST

अकोला बस स्थानकावरील प्रकार; आरोपीला रंगेहात पकडले!

अकोला, दि. १९- एसटी वाहकाकडील तिकिटांचे पैसे लंपास करण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. एसटी वाहक आनंद गोपाल पिल्ले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी ते बसस्थानक डेपोमध्ये जेवण करीत होते. त्यांच्या शर्टाच्या खिशात तिकिटांची ६ हजार ३८६ रुपये रोख होती. जेवण करण्यापूर्वी पिल्ले यांनी शर्ट भिंतीवरील खुंटीला टांगले आणि जेवायला बसले. तेवढय़ामध्ये अमरावती शहरातील आझादनगरात राहणारा आरोपी शेख रोशन शेख इमाम याने एसटी वाहक पिल्ले यांची नजर चुकविण्याचा प्रयत्न केला आणि खिशातील रोख अलगद काढू घेण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु चोरट्याच्या कृत्याकडे पिल्ले यांचे लक्ष गेल्यावर त्यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी शेख रोशन हा पळून जाऊ लागला. दरम्यान, पिल्ले यांनी त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांना आवाज दिला. सर्वांनी मिळून आरोपी रोशनला पकडले आणि पोलीस चौकीत आणले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सिव्हिल लाइन पोलिसांच्या ताब्यात दिले. पिल्ले यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी शेख रोशन याच्याविरूद्ध भादंवि कलम ३७९, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.