शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल बांधकामाला गती देण्याचा प्रयत्न - विनोद वानखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 18:09 IST

Washim News वाशिम जिल्ह्यातील घरकुल बांधकामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे डॉ. विनोद वानखडे यांनी सांगितले.

वाशिम : अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करणे आदी उद्देशाने वाशिमसह राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मूळ उद्देश, अपूर्ण घरकुले, त्यामागील कारणे, अनुदान वितरण आदीसंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखडे यांच्याशी शनिवार संवाद साधला. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील घरकुल बांधकामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे डॉ. वानखडे यांनी यावेळी सांगितले.

महाआवास अभियानाचा उद्देश काय आहे?अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलासाठी लाभार्थीकडे जागा उपलब्ध नसल्यास सरकारी जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमण असल्यास नियमानुकूल करणे, जागा खरेदीसाठी अनुदानाव्यतिरिक्त बँकांकडून ७० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे आदी उद्देशातून २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात महाआवास अभियान राबविले जात आहे. वाशिम जिल्ह्यातही या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. ८ जानेवारी रोजी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनीदेखील वाशिम जिल्ह्यात या अभियानाचा आढावा घेतला.

या अभियानांतर्गत कोणत्या योजनेबाबत जनजागृती केली जात आहे.?पात्र लाभार्थीला हक्काचे घर मिळण्यासाठी शासनाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, आदीम आवास, अटल बांधकाम कामगार आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीची योजना आदी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना ग्रामीण भागातील लाभार्थींपर्यंत पोहचविण्यात येत आहेत.

गत चार वर्षात किती घरकुले मंजूर आहेत ?ग्रामीण भागात रमाई आवास योजनेंतर्गत गत चार वर्षांमध्ये ७१५४ घरकुले मंजूर झालेली आहेत. यापैकी जवळपास चार हजारावर घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असून, उर्वरीत घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

घरकुल बांधकामासाठी लाभार्थींना मोफत रेती मिळू शकली नाही?जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव अद्याप झाले नाहीत. रेतीघाट लिलाव झाल्यानंतर शासन नियमानुसार लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी मोफत रेती मिळावी याकरीता संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत