शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक अकाउंट हॅक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 21:48 IST

फेसबुक अकाउंट हॅक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला

मूर्तिजापूर : येथील एका शिक्षकाचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यांच्या नावावर मेसेंजरवर मेसेज करून दुसºया शिक्षक मित्राला ५ हजार रुपये बँक खात्यात टाकण्याची मागणी केली. सदर प्रकार हा फसवेगिरीचा वाटत असल्याने थेट आपल्या शिक्षक मित्राला फोन लावला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा परिषद मराठी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक इर्शाद हुसेन खान यांना फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून अशोक उमाळे केंद्र प्रमुख किनखेड यांचे मॅसेंजर हॅक करून ५ हजार रुपयांची मागणी केली. हॅकर्सने मुलीची तब्येत खराब असल्याचे सांगितले. तेव्हा उमाळे हे आपल्याला ५ हजार मागू शकत नसल्याने ईर्शाद खान यांना शंका आली. त्यांनी त्या हॅकर्सला व्यस्त ठेवून अशोक उमाळे यांच्याशी संपर्क साधला असता अशोक उमाळे यांनी आपण कुठलाही मेसेज केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे उमाळे यांचे फेसबुक अकाउंट कोणीतरी हॅक केले असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा ईर्शाद खान यांनी सदर हॅकर्सला अनेक प्रश्न विचारले असता त्याने निरुत्तर होऊन मेसेजेस करणे थांबविले. एवढेच नव्हे तर त्या हॅकर्सने अशोक उमाळे यांच्या संपर्कातील अनेक लोकांना मेसेजेस करून माझी मुलगी आजारी असून, तिला दवाखान्यात भरती केले आहे, मला पैशाची अत्यंत गरज असून, मी आपणाला बँक खाते क्रमांक देतो. त्यावर शक्य तेवढ्या लवकर ५ हजार रुपये टाका. ते मी संध्याकाळपर्यंत परत करतो, असे मेसेजेस करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला; परंतु ईर्शाद खान या शिक्षकाने तो हाणून पाडला. (शहर प्रतिनिधी)
टॅग्स :Akolaअकोलाcyber crimeसायबर क्राइमMurtijapurमुर्तिजापूर