शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमकांचा महापालिकेच्या पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 12:11 IST

अकोला: टॉवर चौकात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर अतिक्रमकांनी दगडफेक करून मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना सोमवारी टॉवर चौकात घडली.

ठळक मुद्दे दुकाने हटविण्याची कारवाई सुरू असताना एका व्यक्तीला जेसीबीचा धक्का लागला.निमित्त साधून इतर फूल विके्रत्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाºयांवर दगडफेक करून मारहाण केली. संबंधित मनपा कर्मचाºयांनी फूल विक्रेत्यांविरोधात तक्रार देण्यासाठी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठले.

अकोला: टॉवर चौकात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर अतिक्रमकांनी दगडफेक करून मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना सोमवारी टॉवर चौकात घडली. याप्रकरणी मारहाण करणाºया फूल विके्रत्यांविरोधातील पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी चांगलीच धावाधाव केली. अखेर मनपा कर्मचाºयांना विनंती करून माफीनामा लिहून देण्याची वेळ काँग्रेसच्या नगरसेवकांवर आल्याची माहिती आहे.शहरातील मुख्य रस्त्यांवर बिनदिक्कतपणे व्यवसाय थाटणाºया अतिक्रमकांमुळे अकोलेकर वैतागले आहेत. मुख्य बाजारपेठसह रस्त्यांलगत ठिकठिकाणी लघु व्यावसायिक, फे रीवाल्यांनी विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत. वाढत्या अतिक्रमणाला कंटाळलेल्या अकोलेकरांचा रोष पाहता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने दररोज मुख्य मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई केली जात आहे. सोमवारी टॉवर चौकातील एसबीआयच्या आवारभिंतीलगत फूल विके्रत्यांची दुकाने हटविण्याची कारवाई सुरू असताना एका व्यक्तीला जेसीबीचा धक्का लागला. त्यामध्ये सदर इसमाच्या कानाला दुखापत झाली. निमित्त साधून इतर फूल विके्रत्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाºयांवर दगडफेक करून मारहाण केली. या मारहाणीत कर्मचाºयांना किरकोळ मार लागला. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित मनपा कर्मचाºयांनी फूल विक्रेत्यांविरोधात तक्रार देण्यासाठी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी धाव घेऊन प्रकरण आपसात घेण्यासाठी प्रयत्न केले.आधी दबाव नंतर माफीनामा!टॉवर चौकात काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविकेच्या पतीने मनपा कर्मचाºयांवर दबावतंत्राचा वापर केला. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आणखी तीन नगरसेवकांनी धाव घेऊन तक्रार मागे घेण्यासाठी सुरुवातीला दबाव आणला. तरीही कर्मचारी तक्रारीवर ठाम असल्याचे पाहून अखेर संबंधित फूल विके्रत्यांनी माफीनामा लिहून दिल्याची माहिती आहे.कारवाई सुरूच राहणार!शहराच्या गल्लीबोळात चक्क रस्त्यांवर अतिक्रमकांनी दुकानांचा बाजार मांडला आहे. यामुळे रस्त्यावरून धड चालणेही मुश्कील झाले आहे. वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर यांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन