शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोचालकावर प्राणघातक हल्ला; धारदार शस्त्रांनी वार; हातपाय मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:35 IST

अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकाराम चौक ते मलकापूरदरम्यान एका आॅटोचालकावर कारमध्ये आलेल्या तिघांनी तसेच आॅटोत असलेल्या आणखी दोन जणांनी सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकाराम चौक ते मलकापूरदरम्यान एका आॅटोचालकावर कारमध्ये आलेल्या तिघांनी तसेच आॅटोत असलेल्या आणखी दोन जणांनी सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात नियाज अहमद कुरेशी हा आॅटोचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पायाला व हाताला दुखापत झाली आहे.अकोट फैलातील रहिवासी नियाज अहमद कुरेशी उमर (४२) यांनी इंडसइंड बँकेकडून अर्थसाहाय्य घेऊन आॅटो खरेदी केला. त्यानंतर आॅटोमध्ये प्रवासी वाहतुकीचे कामकाज ते करीत आहेत. सोमवारी रात्री उशिरा रेल्वे स्टेशनवर प्रवासी वाहतुकीसाठी उभे असताना दोन युवक त्यांच्याकडे आले. तसेच गोरक्षण रोडवरील मलकापूर येथे जाण्यासाठी त्यांनी नियाज अहमद यांचा आॅटो भाडेतत्त्वावर घेतला. आॅटोचालक या दोघांना घेऊन मलकापूरकडे जात असताना तुकाराम चौकाच्या समोर गेल्यानंतर आॅटोमधील दोघांनी त्यांना आॅटो थांबविण्यास सांगितले. आॅटोचालकाने आॅटो थांबवताच सदर दोघांनी त्यांच्या आॅटोची चाबी काढून घेत सदर आॅटो अर्थसाहाय्य घेऊन घेतल्याची आरडा-ओरड करीत आॅटोला लाथाबुक्क्या मारल्या. आॅटोचालकाने या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर दोघांनी नियाज अहमद यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पाठीमागून आलेल्या कारमधून तीन युवक उतरले व त्यांनीही आॅटोचालकास बेदम मारहाण करीत चाकू व धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये आॅटोचालक नियाज अहमद गंभीर जखमी झाल्यानंतर या पाचही जणांनी घटनास्थळावरून पळ काढला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नियाज अहमद यांना खदान पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता हात व पायाला फ्रॅक्चर असल्याचा अहवाल समोर आला आहे. या प्रकरणी नियाज अहमद यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी अज्ञात पाच ते सहा जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी फरार झाले असून, खदानचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी