शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’ फोडून  १२.५0 लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:44 IST

दिग्रस बु : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चान्नी-वाडेगाव मुख्य मार्गावरील सस्ती येथील बसस्थानकाजवळील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील १२ लाख ५२ हजार ९00  रुपये लंपास केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. मागील दीड महिन्यात सायवणी, चतारी, पिंपळखुटा, खेट्री, चान्नी आदी गावांत चोर्‍या झाल्या आहेत. परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सस्तीमधील चोरीची घटना यापैकी सर्वात मोठी आहे. या चोरीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

ठळक मुद्देसस्ती येथील घटना गॅस कटरने तोडले शटर

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चान्नी-वाडेगाव मुख्य मार्गावरील सस्ती येथील बसस्थानकाजवळील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील १२ लाख ५२ हजार ९00  रुपये लंपास केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. मागील दीड महिन्यात सायवणी, चतारी, पिंपळखुटा, खेट्री, चान्नी आदी गावांत चोर्‍या झाल्या आहेत. परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सस्तीमधील चोरीची घटना यापैकी सर्वात मोठी आहे. या चोरीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.   सस्ती येथे १६ ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांनी गस्त घातली होती. त्यानंतर रात्री २ ते ४ वाजताच्या दरम्यान सस्ती येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या एटीएम मशीनजवळ चोरांनी गाडी लावून गॅस कटरने शटर तोडून एटीएममध्ये प्रवेश केला. तेथील एटीएम मशीन फोडून त्यातील १२ लाख ५२ हजार ९00  रुपयांची चोरी केली असल्याचे वृत्त आहे. या एटीएममध्ये पैसे टाकणार्‍या कर्मचार्‍याने ११ ऑगस्ट रोजी त्यात २१ लाख रुपये टाकले होते. या चोरीच्या घटनेबाबत येथील पोलीस पाटील बदरखे यांनी चान्नी पोलीस स्टेशनला कळविले. त्यानंतर चान्नी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर घटनास्थळावर फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांना येथील कॅमेर्‍यावर फिंगर प्रिंट दिसून आल्याचे वृत्त आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ही चोरीची या परिसरातील सर्वात मोठी घटना असून, यामुळे परिसरातील गावांमधील नागरिक भयभीत झाले आहेत. परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे सस्ती येथील गावकर्‍यांनी एका गुरख्याला नियुक्त केले होते; परंतु तरीही ही चोरी घडली, हे विशेष. 

गुरख्यालाही चकमा!गुरखा रात्री गस्त घालत होता. तरीही त्याला चोरटे दिसून आले नसल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, बाळापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाला गती दिली आहे. ही चोरी होत असताना जवळ राहणार्‍या वयोवृद्धाने ते पाहिले; परंतु जीवाच्या भीतीने त्याने आरडाओरड केली नाही. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्याच्या सांगण्यानुसार पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला आहे.