शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

खिलाडूवृत्तीने प्रदर्शन केल्यास यश निश्चित - जितेंद्र पापळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 5:54 PM

 राज्यस्तरीय  शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे उद्घाटन  बुधवार (दि.२५) रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले.

अकोला :खेळाडूंनी  खेळात  सातत्य टिकवून ठेवावे तसेच खेळातील जय पराजयचा स्विकार खिलाडूवृत्तीने करून खेळ प्रदर्शन केल्यास यश निश्चित लाभते.हे दोन्ही गुण महत्त्वाचे असून त्याचा पुढील आयुष्यात खूप उपयोग होतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  केले.            क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला  यांचे  संयुक्त विद्यमाने १४,१७,१९ वर्षाआतील मुले व मुली  राज्यस्तरीय  शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे उद्घाटन  बुधवार (दि.२५) रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.             यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी   आयुष  प्रसाद, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख,  जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  प्राप्त  नाजुकराव पखाले,  जिल्हा क्रीडा  परिषदचे  सदस्य जावेद अली, डॉ अमोल रावणकर उपस्थित होते.            खेळाडूंना शुभेच्छा देत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने स्पर्धेत भाग घेवून यशस्वी व्हावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी केले.  आभार जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी मानले.            जिल्हा क्रीडा परिषदेचे ध्वजारोहण तसेच क्रीडा ज्योत प्रज्वलन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी  विद्यार्थ्यांना  शपथ देण्यात आली. स्पर्धेची सुरूवात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शटल टॉस करून केली.            दोन दिवस चालणाऱ्या  या राज्यस्तरीय  शालेय बॅडमिंटन स्पर्धेतुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBadmintonBadminton