शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा तोंडावर; खड्डे बाकी, वृक्ष लागवड होणार कशी?

By संतोष येलकर | Updated: May 14, 2024 21:00 IST

आचारसंहितेत अडकले नियोजन : तांत्रिक, प्रशासकीय मान्यताही रखडल्या

अकोला: पावसाळा तोंडावर आला असला तरी, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील यंदाच्या वृक्ष लागवडीचे नियोजन अडकले आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता रखडल्याच्या स्थितीत वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्याची कामे सुरू होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे वृक्ष लागवड सुरू होणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

दरवर्षी पावसाळ्यात ‘नरेगा’ अंतर्गत वृक्ष लागवड केली जाते. त्यापूर्वी ग्रामपंचायती आणि यंत्रणास्तरावरील वृक्ष लागवडीचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत केले जाते, परंतु यंदा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, जिल्ह्यातील वृक्ष लागवडीच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे. पावसाळा सुरू होण्यास १८ दिवसांचा कालावधी उरला असतानाही वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्याची कामे अद्याप सुरू हाेऊ शकली नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यात वृक्ष लागवड सुरू होणार तरी कधी, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. १३,७०३ कामे प्रस्तावित!‘नरेगा’ अंतर्गत यंदाच्या जिल्ह्यातील कामांच्या आराखड्यात ग्रामपंचायतींच्या स्तरावर ९ हजार आणि विविध शासकीय यंत्रणांच्या स्तरावर ४ हजार ७०३ अशी एकूण १३ हजार ७०३ वृक्ष लागवडीची कामे प्रस्तावित असून, या कामांची अंदाजपत्रकीय किंमत ३०६ कोटी ९१ लाख रुपये आहे. वृक्ष लागवडीच्या एका कामात एक हजार ते १ हजार ६०० रोपांची लागवड केली जाते, अशी जिल्हा परिषद ‘नरेगा ’ कक्षाच्या सूत्रांनी दिली. ग्रामपंचायतींचे ठरावही रेंगाळले !वृक्ष लागवडीच्या कामांसाठी ग्रामपंचायतींनी ठराव घेणे आवश्यक आहे; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून यासंदर्भात ठराव घेण्याची प्रक्रिया देखील रेंगाळली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यातील वृक्ष लागवडीच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.एच.जे.परिहारगटविकास अधिकारी (नरेगा) , जिल्हा परिषद.

टॅग्स :Akolaअकोला