शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

भूखंडाच्या आर्थिक वादातून आसिफ खानची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:42 IST

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दुसरीकडे सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह सापडला नसल्याने हा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान अकोला पोलिसांसमोर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर ...

ठळक मुद्देतीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे.आसीफ खान यांची हत्या केल्यानंतर मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदी पात्रात फेकण्यात आला. आसीफ खान यांची गळा आवळून हत्या क रताना त्यांनी प्रतिकार केल्याची कबुली पोलिसांनी दिली.

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दुसरीकडे सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह सापडला नसल्याने हा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान अकोला पोलिसांसमोर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्लॉटच्या आर्थिक वादातून हत्या

वाशिम जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष ज्योती अनिल गणेशपुरे व आसीफ खान मुस्तफा खान यांनी पार्टनरशीपमध्ये प्लॉट व फ्लॅटसह शेती खरेदी केलेली आहे. गत चार वर्षांपासून या दोघांचे आर्थिक व्यवहार असल्याचेही समोर आले आहे; मात्र गत काही दिवसांपासून एका प्लॉटच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद सुरू झाले. याच वादातून आसीफ खान यांची हत्या झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासोबतच या हत्या प्रकरणाला आणखी काही कंगोरे असले, तरी पोलिसांकडे त्याचे पुरावे नसल्यामुळे पोलीस अधिकाºयांनी त्या विषयावर बोलण्याचे टाळले.हत्येला अपघाताचा बनावआसीफ खान यांची हत्या केल्यानंतर मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदी पात्रात फेकण्यात आला, त्यानंतर आसीफ खान यांची एमएच ०१ सीए १३३९ क्रमांकाची कार नदीत लोटण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सदर कार चिखलात फसल्यामुळे ती नदीत लोटण्याचा प्रयत्न फसला. यातच हत्येचा अपघात बनविण्याचा डावही अयशस्वी ठरल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. या हत्याकांडानतर अपघात दाखविण्याचा बनाव सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील आमला येथे केली हत्या!अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आमला या गावात ज्योती गणेशपुरे हिची बहीण रहिवासी आहे. याच ठिकाणी आसीफ खानला बोलावून आमला गावातच त्यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. ज्योती अनिल गणेशपुरे, वैभव अनिल गणेशपुरे व स्वप्निल नितीन वानखडे या तिघांसोबतच आणखी तीन आरोपींचा आसीफ खानच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचेही समोर आले आहे.कारमधील रक्ताचे नमुने घेतले!आसीफ खान यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांचीच एमएच ०१ सीए १३३९ क्रमांकाच्या कारमध्ये म्हैसांग येथील पूर्णा नदीवर आणण्यात आला. सदरचा मृतदेह एका चादरमध्ये गुंडाळून आणण्यात येत असताना आसीफ खानच्या रक्ताचे डाग कारमध्ये दोन ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, ते चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

रक्त नमुने जुळविण्यासाठी ‘डीएनए’चा पर्यायकारमध्ये आढळलेले रक्ताचे डाग हे आसीफ खानचेच आहेत का, यावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यासाठी आसीफ खान यांच्या कुटुंबीयातील व्यक्तीचे रक्त नमुने घेऊन डीएनए करण्याचा पर्याय पोलिसांकडे खुला असून, त्या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत; मात्र त्यापूर्वी मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

प्रतिकारातील चाकू जप्तआसीफ खान यांची गळा आवळून हत्या क रताना त्यांनी प्रतिकार केल्याची कबुली पोलिसांनी दिली. या प्रतिकारात आसीफ खानने चाकूने हल्ला केल्यामुळे ज्योती गणेशपुरे यांच्या गळ्यावर मोठी जखम झाली आहे, तर त्यांचा मुलगा वैभवही जखमी झाला आहे. सदरचा चाकू पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखून