संतोष येलकर/अकोला: स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामांचे ह्यटार्गेटह्ण पूर्ण करण्यासाठी गावोगावी आशा सेविकांची मदत घेतली जाणार आहे. त्या ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करणार आहेत. आशा सेविकांच्या सक्रिय सहभागातून शौचालय बांधकामांसाठी खेडोपाडी व्यापक जनजागृती करण्याचे नियोजन अकोला जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २0१५-१६ या वर्षात अकोला जिल्ह्यात ४९ हजार शौचालयांचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी शौचालयाचे महत्त्व ग्रामस्थांना सांगण्याची आणि त्यासंदर्भात त्यांच्यात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या आशा सेविकांकडून आरोग्य शिक्षणासह लसीकरण, अँम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे व इतर प्रकारची कामे केली जातात. ग्रामस्थांना आरोग्यासंबंधी विविध योजनांची माहिती देण्याचे काम आशा सेविकांकडून प्रभावीरीत्या केले जाते. त्यानुषंगाने स्वच्छ भारत अभियानात शौचालय बांधकामाचे ह्यटार्गेटह्ण पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार ५0 आशा सेविकांची मदत घेण्यात येणार आहे. गावागावांमध्ये महिला व पुरुषांच्या बैठका घेऊन, शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून देत यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे काम या आशा सेविका करतील. शौचालय बांधकामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ही संकल्पना जिल्हा परिषद प्रशासन राबविणार आहे. शौचालय बांधकामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आशा सेविकांची मदत घेण्याची संकल्पना राज्यात पहिल्यांदा अकोला जिल्हा परिषदेनेच मांडली आहे. *महिलांच्या प्रबोधनातून मिळेल उद्दिष्टपूर्तीला चालना! स्वच्छ भारत अभियानात शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आशा सेविका गावागावांमध्ये महिलांच्या बैठका घेणार आहेत. त्या माध्यमातून शौचालय बांधकामांसंबधी महिलांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील शौचालयांच्या बांधकामाला मोठय़ा प्रमाणात चालना मिळणार आहे.
शौचालय बांधकामांचे ‘टार्गेट’ गाठण्यासाठी ‘आशां’ची मदत
By admin | Updated: April 4, 2015 01:58 IST