शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दीड दशकाची फलक लेखन परंपरा जोपासणारा 'अरूण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 09:17 IST

अरुण घोडसाड यांची पारखी व चिकित्सक नजर सतता बातम्यांचा शोध घेत असते, त्यामुळे ब-याचदा वर्तमानपत्रात न आलेल्या परंतु शहराच्या दुष्टीकोनात महत्त्वाच्या असलेल्या घडमोडी अरुण घोडसाड अचूकपणे टिपतात. त्यांच्या व्यवसायातून सवड काढून ते आपला आगळा-वेगळा छंद जोपासत आहे.

कारंजा (वाशिम), दि. 21 - वाटसरूंचे लक्षवेधून ते थबकतात व सबंध फलक लेखन वाचून काढतात व पुढे वाटचाल करतात. अनभिज्ञ अशा घटना उपयुक्त अशी माहिती ताज्या घडामोडी शहरातील वेंचक घटना यांची संवेदनशिल मनाने दखल घेउन आपल्या दुकानाजवळ लोकसेवेस्तव असलेल्या फलकावर वाचनीय, लोकोपयोगी मजकूर लिहितात. तसेच परिसरातील उल्लेखनिय प्रसंग, वार्ता लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम कारंजा येथील अरूण घोडसाड दिड दशकापासून अविरत करीत आहेत.अरुण घोडसाड यांची पारखी व चिकित्सक नजर सतता बातम्यांचा शोध घेत असते, त्यामुळे ब-याचदा वर्तमानपत्रात न आलेल्या परंतु शहराच्या दुष्टीकोनात महत्त्वाच्या असलेल्या घडमोडी अरुण घोडसाड अचूकपणे टिपतात. त्यांच्या व्यवसायातून सवड काढून ते आपला आगळा-वेगळा छंद जोपासत आहे. घोडसाड हे महाराष्ट्र नाभिक संघाचे वाशिम जिल्हा सचिव आहेत. त्यांचा व्यवसाय केस कर्तनालयाचा आहे. फावल्या वेळात माहिती जमा करून स्वत: लेखन करतात. शहरातील विविध कार्यक्रमांचे आयोजन आज कुठे काय ? या शिर्षकातून ते फलकावर उमटवितात. त्यांना स्वत:ला वाचन व्यासंग असल्यामुळे संकलीत केलेल्या माहितीवर ते योग्य संस्कार करतात. बेरोजगारासाठी असलेल्या नोकरीच्या संधी, रेल्वेचे वेळापत्रक, सैन्य भरती, पोलीस भरती, व राजकीय महत्त्वाच्या बातम्या ते फलकावर लिहितात.

ते स्वत: माहिती जमवतात. लोकांकडून मिळवतात. त्या आधारे फलक लेखन करतात. त्यांच्या ग्राहकांना व सराफ लाईन मधून ये जा करणा-या वाटसरूना ही माहिती सहज वाचता येते. त्याच्या माहीती लेखनात स्पष्टता, निशंदिग्धता , अचुक्ता , सुगमता असल्यामुळे लोकांना सहज माहीतीचे आकलन होते. या फलक लेखनाचा एक भाग म्हणजे ते वाचकासाठी एक रोज नवीन सुविचार देतात. कोणत्याही जाती, पंथ, पक्ष ,भाषा याबद्दल आकस न ठेवता फलक लेखन करतात. हे त्यांच्या फलक लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या फलक लेखनाच्या कार्याबद्ल आमदार राजेंद्र पाटणी यांना आश्चर्य वाटले त्यांनी फलक लेखनाचे महत्त्व लक्षात घेउन लेखकाचे कौतुक केले. असे सजग नागरिक माज्या मतदार संघात आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.आपल्या फलक लेखनामुळे लोकांना महत्त्वाच्या घडामोडी कळतात. वाचकांच्या चेह-यावर उमटणारे आश्चर्य व समाधान आनंद देउन जाते.- अरुण घोडसाड