अकोला : ह्यजे का रंजले, गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावाह्ण, या संत तुकाराम यांच्या अभंगाची प्रचिती 'लोकमत' व साधू वासवानी ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप शिबिरात आली. स्वराज्य भवनात रविवारी सकाळी ८ ते २ या वेळेत आयोजित या शिबिरामध्ये २४३ दिव्यांगांना कुत्रिम अवयवयाचा आधार देण्यात आला. सामान्य जीवन जगण्यासाठी मनुष्याला निसर्गाने दिलेले सर्वच अवयव हवेत. दुर्दैवाने अनेकांना अपघात किंवा इतर काही कारणांमुळे हात, पाय यासारखे महत्त्वपूर्ण अवयव गमवावे लागतात. मनुष्याचे एक बोट जरी जायबंदी किंवा निकामी झाले, तरी दैनंदिन काम करताना अडचणी येतात. काही लोकांना तर अख्खा हात, पाय किंवा दोन्ही हात व पाय गमवावे लागतात. समाजातील अशा घटकांसाठी काही तरी करावे, या उद्देशाने पुणे येथील साधू वासवानी ट्रस्ट व ह्यलोकमतह्ण अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जयपूर फूट वाटप शिबिराचे आयोजन रविवारी स्वराज्य भवनात करण्यात आले होते. या शिबिरात केवळ अकोला शहरच नव्हे, तर संपूर्ण जिल्हा व नजीकच्या जिल्हय़ांमधूनही गरजू व्यक्तींनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली. शिबिरात आलेल्या दिव्यांग व्यक्ती शरीराने अधू असल्या तरी त्या मनाने कुठेही खचलेल्या दिसत नव्हत्या. 'लोकमत'च्या चमूने शिबिरात आलेल्या दिव्यांग व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करून त्यांची नावे नोंदवून घेतली. तर साधू वासवानी ट्रस्टच्या चमूने या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून त्यांच्या गजरे प्रमाणे कुत्रिम अवयव तयार करून देण्यासाठी आवश्यक ती मापे घेतली. शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांग व्यक्तींना दीड महिन्यानंतर कृत्रिम हात व पायांचे वितरण करण्यात येणार आहे.
शेकडो दिव्यांगांना दिला कृत्रिम अवयवयांचा आधार!
By admin | Updated: March 21, 2016 01:56 IST