शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

कला, वाणिज्य शाखेच्या प्रश्नपत्रिका येणार ऑनलाइन

By admin | Updated: March 4, 2017 02:21 IST

अमरावती विद्यापीठ प्रश्नपत्रिका एक तासापूर्वी संकेतस्थळावर टाकणार.

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. ३- विद्यापीठांतर्गत होणार्‍या कला व वाणिज्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आता परीक्षा केंद्रांवर छापील स्वरूपात न येता परीक्षेच्या एक तास आधी ऑनलाइन टाकण्यात येणार असून, झेरॉक्स काढून परीक्षार्थींना वाटण्यात येणार आहे. गतवर्षी केवळ विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठविण्यात आल्या, तर आता कला व वाणिज्य शाखेच्या प्रश्नपत्रिकाही ऑनलाइन पाठविण्यात येणार आहेत. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून, विद्यापीठाच्या परीक्षांना पुढील महिन्यापासून प्रारंभ होणार आहे. यावर्षी शासनाने महाविद्यालयीन परीक्षा पद्धतीत बदल करण्याचे ठरविले आहे. सध्या प्रत्येक जिल्हय़ाच्या ठिकाणी प्रश्नपत्रिका पोलीस संरक्षणात ह्यकस्टडी रूमह्णमध्ये ठेवण्यात येतात. त्यानंतर पेपरच्या पहिल्या दिवशी या प्रश्नपत्रिका कस्टडी रूममध्ये आणण्यात येतात. पेपरच्या दिवशी एक तास आधी या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राकडून आलेल्या कर्मचार्‍याकडे सोपविण्यात येतात. यामध्ये आता बदल करण्यात आला असून, आता विद्यापीठाने तयार केलेल्या संकेतस्थळावर प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या एक तास आधी ऑनलाइन टाकण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित परीक्षा केंद्रांवरील केंद्रप्रमुखाला या प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढून परीक्षार्थींना वाटण्यात येणार आहे. यामध्ये अधिक गुप्तता पाळण्याकरिता प्रत्येक महाविद्यालय व परीक्षा केंद्राला एक कोड देण्यात येणार आहे. सदर कोड महाविद्यालयाने संकेतस्थळावर टाकल्यानंतर तो स्कॅन करण्यात येईल. सदर कोड जुळल्यानंतरच प्रश्नपत्रिका निदर्शनास पडणार आहे. संकेतस्थळ बंद पडले, तर प्रश्नपत्रिका ई-मेल किंवा व्हॉट्सअँपवर!विद्यापीठाच्या वतीने संकेतस्थळावर एक तास आधी प्रश्नपत्रिका टाकण्यात येणार आहे; मात्र जर एखाद्या वेळी संकेतस्थळ बंद असले किंवा प्रश्नपत्रिका निदर्शनास पडली नाही, तर महाविद्यालयाच्या ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. त्यातही अडचणी आल्या, तर संबंधित परीक्षा केंद्रातील केंद्रप्रमुखाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका तपासणार ऑनलाइन! गतवर्षीपासून विज्ञान शाखेच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्यात येत आहेत. उत्तरपत्रिका संगणकावर स्कॅन करून टाकण्यात येते. त्यानंतर सदर उत्तरपत्रिका संबंधित प्राध्यापक तपासून गुणही ऑनलाइन टाकतो. आता ही पद्धत सर्वच कला व विज्ञान शाखेच्या पेपर तपासण्याकरिताही अमलात आणण्यात येणार असल्याची माहिती आहे.