लोकमत न्यूज नेटवर्कपातूर: तालुक्यातील बाभूळगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या त्याच गावातील आरोपी विज्या ऊर्फ विजय आडे (२१) याला पातूर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कार्ल्याच्या जंगलातून अटक केली.बाभूळगाव येथे आपल्या बहिणीकडे राहणार्या विज्या ऊर्फ विजय आडे (२१) याने त्याच गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपूर्वी बळजबरी लैंगिक अत्याचार केला. याविषयी कुठे वाच्यता केल्यास, जीवे मारण्याची धमकीही त्याने मुलीला दिली. यानंतर सातत्याने, तो मुलीच्या घरी यायचा आणि तिला धमकी देऊन, तिच्यावर अत्याचार करायचा. त्याने मुलीला लग्न करण्याचेही आमिष दाखविले होते. आरोपी विज्या आडे याने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे मुलीला गर्भधारणा झाली. तिच्या पोटात दुखू लागल्याने, तिला स्त्री रुग्णालयात भरती केले. यावेळी मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. वैद्यकीय अधिकारी व कुटुंबीयांनी ितला विचारणा केल्यावर तिने तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराला वाचा फोडली. मुलीच्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपी विज्या ऊर्फ विजय आडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, पॉस्कोनुसार गुन्हा दाखल करून, प्रकरण पातूर पोलिसांकडे वर्ग केले. दरम्यान, पातूर पोलिसांनी गुरुवार, १४ डिसेंबर रोजी विजय आडे याला अटक केली. ठाणेदार डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय महल्ले, जमादार डी. बी. अढाव यांनी ही कारवाई केली.
बाभूळगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:05 IST
पातूर: तालुक्यातील बाभूळगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या त्याच गावातील आरोपी विज्या ऊर्फ विजय आडे (२१) याला पातूर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कार्ल्याच्या जंगलातून अटक केली.
बाभूळगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्यास अटक
ठळक मुद्देआरोपी विजय आडे याने जीवे मारण्याची धमकी देऊन सातत्याने केला अत्याचारमुलीला गर्भ राहिल्यामुळे प्रकरण आले होते उघडकीस