शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमकांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था; महापौरांचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 12:50 IST

रस्त्याच्या मधोमध दुकान थाटणाºया अतिक्रमकांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत विभाग प्रमुखांना दिले.

अकोला: मुख्य रस्त्यांलगत बाजार मांडणाºया लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांमुळे संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, सर्वसामान्य अकोलेकरांना रस्त्यावरून पायी चालणे मुश्कील झाले आहे. आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता चक्क रस्त्याच्या मधोमध दुकान थाटणाºया अतिक्रमकांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत विभाग प्रमुखांना दिले.अवघ्या अकरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी आतापासूनच बाजारपेठमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र आहे. शहरातील अतिक्रमणाच्या समस्येचा अकोलेकरांना पुरता वैताग आला आहे. दिवाळीच्या दिवसांत चक्क रस्त्याच्या मधोमध किरकोळ विके्रता, लघू व्यावसायिक व फेरीवाले बाजार मांडतात. त्यामुळे मुख्य बाजारपेठमध्ये अक्षरश: जाम होत असल्याचे चित्र दरवर्षी पाहावयास मिळते. बाहेरगावातून आलेले गोरगरीब विके्रते दोन दिवसांकरिता लक्ष्मी मूर्ती, पणत्या, दिवे, बत्तासे तसेच पूजा साहित्याची दुकाने सजवितात. वाहतुकीला अडथळा होत असल्याने त्यांच्यावर नाइलाजाने कारवाई करावी लागते. हा प्रकार थांबविण्यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी दालनात मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमकांना किमान दिवाळीच्या दिवसांत तात्पुरती व्यवस्था म्हणून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. बैठकीला उपायुक्त सुमंत मोरे, नगररचनाकार संजय पवार, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, स्वच्छता विभागाचे अधीक्षक प्रशांत राजूरकर, विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे, बाजार विभाग प्रमुख संजय खराटे आदी उपस्थित होते.या ठिकाणी होणार पर्यायी व्यवस्था!* जनता भाजी बाजारालगतच्या मुंगीलाल बाजोरिया मैदानावर पूजा साहित्य, पणती, दिवे, फुले-पाने आदींची विक्रीसाठी दुकाने* भाटे क्लबलगतच्या मैदानात फुलांची विक्री करणाºया व्यावसायिकांची दुकाने* सिटी कोतवालीलगतच्या मोर्णा नदीच्या गणेश घाटावर रेडीमेड कापड विके्रत्यांची दुकाने* उपरोक्त सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था, स्वच्छतेची सुविधा निर्माण केली जाईल....तर साहित्य जप्त करा!मनपाने निश्चित केलेल्या जागेवर दुकाने न उभारता रस्त्यावर अतिक्रमण केल्यास संबंधितांचे साहित्य जप्त करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. जागेसंदर्भात काही शंका-कुशंक ा असतील, तर संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

झोननिहाय जागा शोधा!दिवाळीनिमित्त पूजेच्या साहित्यासह विविध साहित्यांची विक्री करण्यासाठी लघू व्यावसायिकांना झोननिहाय जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जागेची तपासणी करून त्याची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका