शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांसाठी आणखी २०० खाटांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 10:36 IST

आयुर्वेदिक महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीत प्रत्येकी १०० - १०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असून, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वसामान्यांचा आधार ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावरचा भार हलका करण्याच्या उद्देशाने कोरोनाची मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आणखी २०० खाटा लवकरच उपलब्ध होणार आहेत. राधाकिशन तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीत प्रत्येकी १०० - १०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.कोरोनाच्या रुग्णांसाठी तालुकास्तरावरही व्यवस्था असली, तरी बहुतांश रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात येत आहेत. आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यावर रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढल्याने अशा रुग्णांना आता थेट आॅक्सिजन सुविधा असलेल्या खाटा द्याव्या लागत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील सर्व ४५० खाटा व्यस्त आहेत. कोविड सेंटर्समध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी पुरेशा खाटा असल्या तरी मध्यम तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आता खाटाच शिल्लक नसल्याचे वास्तव आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सरसावला असून, येत्या आठवडाभरात अकोला शहरातील राधाकिशन तोष्णिवाल आयुर्वेद महाविद्यालयात १०० खाटांची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर उघडण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच रुग्ण शुश्रूषा सुरू होणार आहे. याशिवाय जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीतही पहिल्या टप्प्यात ५० खाटांचे कोविड सेंटरचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सकांनी ठेवला आहे. त्यानंतर दुसºया टप्प्यात आणखी ५० खाटांचे कोविड सेंटर होणार आहे. या दोन्ही ठिकाणी मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.कंत्राटी तत्त्वावर घेणार मनुष्यबळनव्याने होणार असलेल्या या दोन्ही कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवेसाठी पुरेसे मनुष्यबळ आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने कंत्राटी तत्त्वावर कुशल मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून पदभरतीसाठी जाहिरात काढण्यात आली असून, सोमवारपासून मुलाखती सुरू होणार आहेत.‘सर्वोपचार’चा भार कमी होणारजिल्हाभरातील मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना सध्या सर्वोपचार रुग्णालयातच ठेवण्यात येत आहे. मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले अनेक रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्यांनाही ‘वेटिंग’वर राहावे लागत आहे. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी नव्याने २०० खाटा होणार असल्याने, सर्वोपचार रुग्णालयात गंभीर रुग्णांना खाटा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.कोरोनाच्या रुग्णांसाठी लवकरच अतिरिक्त २०० खाटा उपलब्ध असून, यापैकी १०० खाटांचे सेंटर आठवडाभरातच कार्यान्वित होणार आहे. या दोन्ही सेंटर्समध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.-डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या