मक्यावरील ‘लष्करी’चा कापसाला धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:05 PM2019-07-28T13:05:18+5:302019-07-28T13:05:31+5:30

अकोला : मका पिकावर लष्करी अळीने बस्तान मांडले असून, या अळीचा प्रादुर्भाव कापूस पिकावरही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावण्याचे नियोजन करताना खबरदारी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

The army worm on corn threatens cotton? | मक्यावरील ‘लष्करी’चा कापसाला धोका?

मक्यावरील ‘लष्करी’चा कापसाला धोका?

Next

अकोला : मका पिकावर लष्करी अळीने बस्तान मांडले असून, या अळीचा प्रादुर्भाव कापूस पिकावरही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावण्याचे नियोजन करताना खबरदारी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना, परभणी आणि बुलडाणा जिल्ह्यातील मका, ज्वारी आणि ऊस या पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीचे पतंग एका रात्रीत सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास करू शकतात. या किडीची प्रजनन क्षमता जास्त असून, मादी पतंग तिच्या जीवनक्रमात सुमारे एक ते दोन हजार अंडी घालते. ही कीड झुंडीने आक्रमण करीत असल्याने काही दिवसांतच पीक फस्त करते. विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात लगतच्या लातूर, परभणी व जळगाव जिल्ह्यात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काळजी घेणे गरजेचे आहे. मका पिकानंतर ही अळी ज्वारी व ऊस पिकावर येते; परंतु लगत ही पिके नसतील आणि अळी उपाशी असल्यास ती कापसावरदेखील आक्रमण करण्याची शक्यता नाकारत येत नसल्याने शेतकºयांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.

 अमेरिकन लष्करी अळी ही प्रामुख्याने मका, ऊस व ज्वारी या पिकांवर येते. कापसावर येत नाही, त्यामुळे शेतकºयांनी घाबरू न जाऊ नये; मात्र दक्ष राहण्याची गरज आहे. खासकरू न बोंडअळीवर लक्ष असू द्यावे, त्यासाठी कामगंध सापळे व कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार शेतकºयांनी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.
- डॉ. धनराज उंदीरवाडे,
विभाग प्रमुख,
कीटकशास्त्र,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

Web Title: The army worm on corn threatens cotton?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.