शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खदानमध्ये दोन समुदायात सशस्त्र हाणामारी

By admin | Updated: November 16, 2016 02:10 IST

आठ जखमी; २२ जणांवर गुन्हे दाखल; मुलांच्या वादातून मोठे भिडले

अकोला, दि. १५- खदान परिसरातील जेतवन नगरात लहान मुलांच्या वादातून दोन समुदायामध्ये सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हाणामारीत आठ जण जखमी झाले असून, पोलिसांनी २२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर सवरेपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून, या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.जेतवन नगरातील रहिवासी मो. रहीम मो. आरीफ यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार लहान मुलांमध्ये सुरू असलेल्या वादातून मुकेश कुर्मी, अनिल कुर्मी, हेमा, लक्ष्मी, ऋषभ हिवराळे, आकाश धवसे, रतन धवसे, अरविंद भगत आणि मनोज शिंदे यांनी मो. रहीम यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना बेदम मारहाण केली. यासोबतच सशस्त्र हल्ला चढविला. यावरून सदर नऊ जणांविरुद्ध खदान पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १४७, १४८, १४९, ३२४, ३0७ आणि ऑर्म्स अँक्टच्या कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला आहे, तर अनिल कुर्मी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मो. शरीफ मो. आरीफ, मो. रशीद मो. आरीफ, फारुख, जाकीर, मुन्ना, साबीर, आसिया परवीन, बेबी, नन्ही, लाला की पत्नी, राजा कांबळे ऊर्फ लखन आणि शाहरुख यांनी अश्लील शिवीगाळ करीत सशस्त्र हल्ला चढविला. यामध्ये काही जण जखमी झाले. या तक्रारीवरून खदान पोलिसांनी १२ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४७, १४८, १४९, ३२४, ३0७ आणि ऑर्म्स अँक्टच्या कलम ४, २५ सह अँट्रॉसिटी अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत दोन्ही गटांतील आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींची धरपकड सुरू केली आहे.