शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

स्थापत्य अभियंत्याचे काम सैनिकासारखे - देवेंद्र लाडंगे

By admin | Updated: April 16, 2015 01:37 IST

‘स्थापत्य अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर’ विषयावर अकोल्यात राष्ट्रीय परिषद

अकोला : स्थापत्य अभियंत्याचे (सिव्हिल इंजिनिअर) काम सैनिकासारखे असून, या अभियंत्यावर देशाची मोठी जबाबदारी असल्याने त्यांनी खर्‍या अर्थाने प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता देवेंद्र सी. लांडगे नाशिक यांनी केले. श्री. शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय बाभूळगाव अकोला व इंडियन वॉटर वर्क असोसिएशनच्यावतीने ह्यस्थापत्य अभियांत्रिकी टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापरह्ण या विषयावर बुधवार, १५ एप्रिल रोजी श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी लांडगे बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक शिक्षण डॉ.जी.आर. शेकापुरे होते. जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता गणेश गोखले अकोला, अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. देशमुख, आयडब्ल्यूडब्ल्यूएचे अध्यक्ष श्रीकांत कालेले अमरावती, अभियंता एल.के.जैन, डॉ.पी.व्ही.दुर्गे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. लांडगे यांनी तांत्रिक बदल हे लोकाभिमुख व नवीन पिढीसाठी उपयोगी असावे, यासाठी स्थापत्य अभियंत्यांनी काम करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. याच बरोबर अभियंत्यांना काम करताना या अभियंत्यांना कंत्राटदार, सामान्य माणसापासून ते राजकीय पुढार्‍यांपर्यंत व्यवस्थापन करावे लागत आहे. त्यासाठी या अभियंत्यांना आता अभियांत्रिकीच्या शिक्षणासोबतच व्यवस्थापनाचे (मॅनेजमेंट) शिक्षण देण्याची गरज आहे. या सर्व परिस्थिती अभियंत्याचे कौशल्य कुचकामी ठरत आहे. पण अभियंत्यांवर देश उभारणीची जबाबदारी असल्याने त्यांनी प्रामाणिकपणे देशासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गोखले यांनी पाण्याची गरज, आहे त्या पाण्याचा यथोचित वापर व देखभाल दुरुस्तीवर मत मांडले. शेकापुरे यांनी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीची जबाबदारी स्थापत्य अभियंत्यावर आहे. तसेच नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठीचे नवे तंत्रज्ञान विकसित करावे, ही जबाबदारी या अभियंत्यांनी प्रामाणिकपणे पार पडण्याचे आवाहन केले. जैन यांनी ह्यपाणी साठवणुकीचे तंत्रज्ञानह्ण या विषयावर सादरीकरण केले. या राष्ट्रीय परिषदेत ५४ संशोधन शोध निबंध प्राप्त झाले आहेत. सायंकाळी या एक दिवसीय परिषदेचा समारोप झाला. या परिषदेला जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांंची उपस्थिती होती. संचालन माधुरी देशमुख यांनी केले. तसेच आनंद जवजांळ, अजय मालोकार, प्रा. अभिनंदन गुप्ता आदींची उपस्थिती होती.