शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या सव्वा फुटावर टाकली जलवाहिनी; तरीही कोट्यवधींचे देयक अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 10:25 IST

महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कोट्यवधींच्या देयकाची उधळण केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरातील जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. यासंदर्भात शिवसेनेने आक्षेप नोंदविल्यानंतरही महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कोट्यवधींच्या देयकाची उधळण केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.केंद्र व राज्य शासनाच्या अमृत अभियान अंतर्गत संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलून नवीन टाकणे, महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी नवीन ८ जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी शासनाने ११० कोटी रुपये निधी मंजूर केला होता. यापैकी मनपा प्रशासनाने ८७ कोटी रुपयांची निविदा प्रकाशित केली. ही निविदा ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ नामक कंपनीची स्वीकारण्यात आली आहे. कंपनीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती केली. या बदल्यात मजीप्राला तीन टक्केनुसार मनपाकडून आर्थिक मोबदला अदा केला जाणार आहे; परंतु कंपनीच्यावतीने शहरात सर्व निकष-नियम बासनात गुंडाळून ठेवत जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असल्याचे चित्र आहे. निकषानुसार किमान साडेतीन फूट अंतरावर जलवाहिनीचे जाळे टाकणे अपेक्षित आहे. तसे न करता कंपनीकडून अवघ्या सव्वा ते दीड फूट अंतरावर जलवाहिनी टाकली जात आहे. शिवसेनेचे मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये एक ते दीड फूट अंतरावर जलवाहिनी टाकली जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजेश मिश्रा यांनी संबंधित काम बंद केले होते.यासंदर्भात मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे तक्रार करून प्रभागात खोदकाम करून जलवाहिनीचे जाळे तपासण्याची विनंतीवजा सूचना प्रशासनाला केली होती. त्यावेळी सदर जलवाहिनीचे जाळे निकषानुसार टाकले नसल्याची बाब तांत्रिक तांत्रिक सल्लागार असलेल्या मजीप्राने मान्य केली होती हे विशेष.देयक अदा न करण्याचे आयुक्तांचे निर्देश हवेतराजेश मिश्रा यांनी पाइपलाइन टाकण्याचे काम थांबवल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता या कामातील अनियमितता चव्हाट्यावर आली होती. त्यावेळी आयुक्तांनी संबंधित कंपनीचे देयक अदा न करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला दिले होते, हे येथे उल्लेखनीय.तरीही चार कोटींचे देयक अदा केले!शिवसेनेच्या आक्षेपानंतर देयक अदा न करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतला होता. तरीही एप्रिल महिन्यात संबंधित कंपनीला चार कोटी रुपयांचे देयक अदा करण्यात आले. याप्रकरणी मनपा आयुक्तांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान, याप्रकरणी सेना काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका